Join us

वॉशिंग मशीनशिवाय झटक्यात कपडे सुकवण्याची निन्जा टेक्निक, लोक म्हणाले - हे देशाबाहेर जायला नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:08 IST

Cloth Drying Video : लोकांना या व्हिडिओतील महिलेची जबरदस्त आयडिया चांगलीच आवडली. खासकरून महिलांनाही आयडिया खूप आवडली.

Cloth Drying Video : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे फोटो खळखळून हसवणारे तर कधी अवाक् करणारे असतात. तर काही व्हिडिओंमध्ये वेगवेगळे भन्नाट टेक्निकही बघायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लोकांना या व्हिडिओतील महिलेची जबरदस्त आयडिया चांगलीच आवडली. खासकरून महिलांनाही आयडिया खूप आवडली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक महिला कपडे सुकवण्यासाठी भन्नाट टेक्निक वापरताना किंवा आयडियाची कल्पना लावताना दिसत आहे. वॉशिंग मशीन नसतानाही कपडे फटाफट कसे सुकवता येतात हे यात एका महिलेनं दाखवलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Arunk750 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'वॉशिंग मशीन खराब झाल्यावर... कपडे सुकवण्याची पद्धत'. यात दिसत आहे की, एक महिला घरात लादी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॉप सेटमध्ये कपडे टाकून हॅंडलने फिरवत आहे. याद्वारे कपडे बरेच सुकलेले दिसत आहेत.

महिलेच्या या भन्नाट आयडियाचं अनेक लोकांनी भरभरून कौतुक केलं आहे. तसेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. बऱ्यांच लोकांनी हा एक जबरदस्त शॉर्टकट असल्याचं म्हटलं. तर काही म्हणाले की, ही आयडिया देशाबाहेर जायला नको. 

टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटके