रेल्वे सुरक्षा बल ( RPF) महिला पोलीसाच्या कर्तव्यदक्षतेचं आणि प्रसंगावधानाचं उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. चेन्नईच्या एग्मोर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने सुटणाऱ्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो घसरला आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडला. त्याचवेळी कर्तव्यावर हजर असलेल्या महिला पोलिस जवानाच्या सर्तकतेमुळे या प्रवासाचा जीव वाचला. (RPF Jawan saved a passenger by pulling him out of the jaws of death when he fell down between train and platform)
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रेल्वे अपघातदरम्यान मोठ्या दुर्घटना घडण्याचा आणि जीव जाण्याचाही धोका असतो. अशावेळी प्रसंगावधान दाखवत महिला जवानानं त्या व्यक्तीचा जीव वाचवल्यामुळे कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
या पोलिसाच्या कर्तव्यदक्षतेचा सत्कार करण्यात आला असून आरपीएफ चेन्नईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सलाम, धन्यवाद अशा प्रतिक्रिया देत आहेत.