Viral News : मेकअप करणं, सजणं जास्तीत जास्त महिलांना आवडतं. पण जर योग्य काळजी घेतली नाही तर मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी त्वचेसाठी घातकही ठरू शकतात. जर मेकअप व्यवस्थित साफ केलं नाही तर त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं. स्वस्त आणि केमिकल असलेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समुळे हळूहळू चेहऱ्याची चमक हरवते. तसेच त्वचेसंबंधी गंभीर समस्याही होऊ शकतात. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं.
गाओ नावाची ही महिला गेल्या २२ वर्षापासून रोज मेकअप करत होती. पण तिने कधीच चेहरा व्यवस्थित साफ केला नाही. यामुळे आता तिच्या चेहऱ्यावर लाल पुरळ आली आहे. त्वचा सूजली आहे आणि काही जागांवर चट्टेही दिसत आहेत.
१५ वयापासून करत होती मेकअप
गाओला मेकअप करायची आवड वयाच्या १५ व्या वर्षापासून आईचं लिपस्टिक पाहून निर्माण झाली होती. तेव्हापासून ती रोज मेकअप करत होती. पण मेकअप व्यवस्थित साफ करण्याकडे ती दुर्लक्ष करत होती. ती असा विचार करत होती की, दुसऱ्या दिवशी जर पुन्हा मेकअप करायचं आहे तर मग काढायची काय गरज. फक्त पाण्यानं चेहरा धुवून झोपत होती. कधीच क्लेंजर किंवा फेसवॉशचा वापर करत नव्हती.
झाली स्किन अॅलर्जी
या वर्षाच्या सुरूवातीलाच गाओच्या स्किनवर गंभीर अॅलर्जी झाली. चेहऱ्यावर गंभीर खाज होऊ लागली. सूज आली, सुरकुत्या आल्या आणि स्थिती इतकी बिघडली की, तिचं बाहेर निघणंही बंद झालं. आश्चर्याची बाब म्हणजे गाओनं एखाद्या स्पेशलिस्टचा सल्ला घेण्याऐवजी स्थानिक ब्यूटी क्लीनिकमध्ये उपचार घेतले. इथे तिला स्किन बूस्टर इंजेक्शन देण्यात आले. ज्या प्रभाव उलटा पडला आणि चेहरा आणखी जास्त बिघडला. चेहऱ्या जांभळ्या रंगाचे पॅच आलेत.
स्वस्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर
गाओनं स्वत: हे मान्य केलं की, ती अनेक वर्ष स्वस्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करत होती. खासकरून स्वस्त फाउंडेशन ज्यामुळे तिच्या स्किनचं मोठं नुकसान झालं. आता ती दुसऱ्यांना सांगत आहे की, ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी ते तपासा आणि मेकअप केल्यानंतर चेहरा व्यवस्थित साफ करायला विसरू नका.