Join us

Womans priceless reaction : लेकानं मोबाईल फोन गिफ्ट केल्यानंतर भाबड्या आईला अश्रू अनावर; आर, माधवननं शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 12:11 IST

Womans priceless reaction after son buys her brand new phone : व्हायरल झालेल्या या  व्हिडिओत एका मुलाने त्याच्या आईला अगदी नवीन फोन देऊन आश्चर्यचकित केले आणि तिची प्रतिक्रिया अगदी अमूल्य होती.

ज्या लेकरांना लाडा,कौतुकानं लहानाचं मोठं केलेलं असतं. ज्यांचे सगळे हट्ट पुरवलेले असतात. तीच लेकरं मोठं झाल्यानंतर आपल्या आई वडीलांच्या आनंदासाठी काही करू पाहतात. त्यापेक्षा  सुखद अनुभव दुसरा कोणताच नसू शकतो.  सोशल मीडियावर माय लेकरांच्या नात्यातील प्रेम दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Womans priceless reaction after son buys her brand new phone)

व्हायरल झालेल्या या  व्हिडिओत एका मुलाने त्याच्या आईला अगदी नवीन फोन देऊन आश्चर्यचकित केले आणि तिची प्रतिक्रिया अगदी अमूल्य होती.  अभिनेता आर माधवनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लोकांना व्हिडीओ पाहण्याचे आवाहन केलं आहे. 

विघ्नेश संम्मू या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ 5 जानेवारी रोजी पोस्ट केला होता आणि त्यानंतर त्याला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याने त्याच्या व्हिडिओला तमिळमध्ये कॅप्शन दिले आहे ज्याचे भाषांतर आहे, “बॅगमध्ये 8800 रुपये किमतीचा फोन होता. पण माझ्या आईला जेवढा आनंद वाटला त्याची किंमत नाही.” हा फोन त्याने आईला वाढदिवसाची भेट म्हणून दिला.

शाब्बास पोरा! अचानक हार्ट अटॅक येऊन बेशुद्ध पडली आई; ७ वर्षांच्या लेकानं दिलं माऊलीला जीवदान

व्हायरल व्हिडिओमध्ये आई नवीन फोनचा बॉक्स उघडते आणि खूपच भावनिक प्रतिक्रिया देते. आर माधवन हा व्हिडिओ पाहून खूप प्रभावित झाला आणि तो सोशल मीडियावर शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. “या आनंदाची किंमत नाही असं त्याने व्हिडिओला कॅप्शन दिले.  

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल