Join us

Woman used noodles to make sweater : बाईनं कमालच केली! चक्क नुडल्स वापरून विणलं स्वेटर; ६० लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:07 IST

Woman used noodles to make sweater : न्यूडल्स खाताना महिलेनं जे काही केलंय ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.

सध्या हिवाळा सुरू असल्यानं वातावरणातील गारवा प्रचंड वाढलाय. घरात, बाहेर सगळीकडेच स्वटेर, जिपर, कानटोपी घातलेले लोक दिसून येत आहेत. तर काहीजण थंडीत बाहेर पडणं टाळून घरातच आराम करत आहेत. अशा वातावरणात प्रत्येकालाच गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होते.  वाफा निघणारं न्यूडल्स सूप हिवाळ्यात अनेकांना प्यायला आवडतं. सोशल मीडियावर नुडल्सचा एका आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.  न्यूडल्स खाताना महिलेनं जे काही केलंय ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही. (Woman used noodles to make sweater) 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला चॉपस्टिक्सच्या मदतीने नूडल्स विणत असल्याचे तुम्ही पाहू शकता. जे पाहून, पहिल्या दृष्टीक्षेपात, कोणालाही ती स्वेटर विणत आहे असे वाटेल. नीट पाहिल्यास दिसून येतं एका भांड्यात नूडल्स शिजवलेल्या असतात, त्या खाण्याऐवजी ती बाई त्यातून 'स्वेटर' विणत असते. म्हणजे ती लोकर म्हणून नूडल्स वापरताना दिसते. त्यामुळेच इंटरनेटवर महिलेची ही अप्रतिम प्रतिभा पाहून लोक अचंबित झाले आहेत.'

५४ व्या वर्षीय स्वत:ला फिट, यंग ठेवण्यासाठी धकधक गर्लचे खास डाएट; स्वत: फोटो शेअर करत म्हणाली की....

हा व्हिडीओ  @mixiaoz नावाच्या पेजने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता, जो आतापर्यंत 6 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून लोक इतके चकीत  होऊन कमेंट्सचा वर्षाव करत आहे. एका युजरने लिहिले की येथे नूडल्स चॉपस्टिक्सने पकडले जात नाहीत आणि ती त्यातून स्वेटर बनवत आहे. तर दुसरीकडे, आणखी एका वापरकर्त्याने याला अप्रतिम कलेचा नमुना म्हटले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्न