Viral News : विचार करा की, आपल्याला सर्दी - खोकला झाला आहे आणि अचानक शिंकल्यानंतर नाकातून जिवंत अळ्या बाहेर पडतात, हा एखाद्या वाईट स्वप्नासारखा नजारा असेल. असं काही होणं भीतीदायक तर आहेच, सोबतच घाणेरडं सुद्धा वाटेल. अलिकडेच ग्रीसमधील एका महिलेसोबत हा असा धक्कादायक प्रकार घडला. जो बघून डॉक्टर सुद्धा विचारात पडले.
काय आहे प्रकरण
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ग्रीसमधील या महिलेचं वय ५८ वर्षे आहे. ती सप्टेंबर महिन्यात मोकळ्या मैदानात काम करत होती, तिथे आजूबाजूला मेंढ्याही पाला-पाचोळा खात होत्या. यादरम्यान त्यांना आपल्या चेहऱ्याच्या आसपास काही माश्या भिरभिरत असल्याचं जाणवलं. पण त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पुढे साधारण एक आठवड्यानंतर सायनसमध्ये त्यांना वेदना जाणवत होत्या आणि काही आठवडे खोकलाही येत राहिला. त्याशिवाय फार काही लक्षणं दिसली नाही.
शिंकल्यावर घडलं भलतंच
१५ ऑक्टोबरला अचानक महिलेला शिंक आली आणि त्यासोबतच एक कीटक किंवा अळी बाहेर पडली. जे बघून त्या घाबरल्या. त्या लगेच डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी चेक केल्यावर सर्जरी केली आणि तेव्हा महिलेच्या नाकातून १० लार्वा म्हणजे कीटकाची पिल्लं काढली.
तपासानंतर समोर आलं की, हे कीटक मेंढ्यांमध्ये आढळणारे शीप बॉट फ्लायचे लार्वा होते. हे कीटक सामान्यपणे मेंढ्या किंवा शेळ्यांच्या नाकांमध्ये राहतात. मनुष्यांमध्ये यांचं संक्रमण फारच दुर्मिळ असतं.
डॉक्टरांनुसार, महिलेच्या नाकात सेप्टम डिव्हिएशन होतं. त्यामुळे त्यांच्या नाकात असं वातावरण तयार झालं की, त्यात लार्वा जिवंत राहतील आणि वाढतील. सामान्यपणे मनुष्यांच्या नाकात असे कीटक जास्त वेळ जिवंत राहत नाही.
Web Summary : A Greek woman working near sheep developed sinus pain and coughing. After sneezing out a live insect, doctors found ten sheep bot fly larvae in her nose. Septum deviation created an environment for the larvae to survive, a rare human infection.
Web Summary : ग्रीस में भेड़ के पास काम करने वाली एक महिला को साइनस में दर्द और खांसी हुई। छींकने पर एक जीवित कीड़ा निकला, डॉक्टरों को उसकी नाक में भेड़ बॉट फ्लाई के दस लार्वा मिले। सेप्टम विचलन ने लार्वा के जीवित रहने के लिए माहौल बनाया, जो कि एक दुर्लभ मानव संक्रमण है।