Join us  

छातीकडे पाहून पाळीव कुत्रा 'तिला' सतत काहीतरी सुचवत होता; कारण समजताच सरकली पायाखालची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 5:02 PM

Dog 'saved her life' after detecting her breast cancer : सुरुवातीला मी फारसा विचार केला नाही पण नंतर गाठ मोठी झाल्यानंतर मला डॉक्टरकडे जावं लागलं.

पाळीव प्राणी घरातल्या माणसांपेक्षाही जास्त आपल्याला जीव लावतात. आपल्या प्रत्येक कृतीकडे त्याचं लक्ष असतं. फक्त हावभाव आणि  हालचालींवरून ते आपली मनस्थिती ओळखतात. सोशल मीडियावर असाच एक प्रकार व्हायरल होत आहे. एका महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तिचा लॅब्राडोर तिला स्तनाचा कर्करोग (Breast cancer)  असल्याचे सांगत होता. कारण त्याने तिचे निदान होण्याआधीच तिला पंजा मारण्यास सुरुवात केली होती. (Woman says her hero pet dog 'saved her life' after detecting her breast cancer)

४६ वर्षीय अॅना नेरा म्हणाली की, ''चार वर्षांच्या हार्वेने माझ्या  उजव्या स्तनावर नेमक्या त्याच ठिकाणी कॅन्सरची गाठ दिसण्यापूर्वी सुमारे सहा आठवडे तिची छाती नाकाने दाबण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मी फारसा विचार केला नाही पण नंतर गाठ मोठी झाल्यानंतर मला डॉक्टरकडे जावं लागलं. नंतर स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते जे लिम्फ नोड्समध्ये पसरले होते. 

तो दिवस सप्टेंबर 2018 मध्ये उजाडलेला, ज्यावेळी माझा पाळी कुत्रा अंगावर येऊन बसला आणि त्याने काहीतरी बिनसल्याप्रमाणे हालचाली करायला सुरूवात केली. मी त्याला थांबावण्याचा प्रयत्न केला पण त्यानं असं वागणं दोन आठवडे चालू ठेवले. तो फक्त माझ्या उजव्या स्तनाबाबत काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करत होता. ''

जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी

आजाराबाबत वेळेवर सावध  केल्यासाठी या महिलेनं तिचा पाळीव कुत्रा हार्वेचे खूप आभार मानले आहे. हे त्याचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. असं म्हणत तिनं आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अनुभव ऐकून  नेटिझन्सनी हार्वेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकुत्रा