Lokmat Sakhi >Social Viral > जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी

जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी

Family arranges grand feast for future son in law with 365 dishes : अस्सं सासर सुरेख बाई! भावी जावयासाठी मुलीकडच्यांनी केलं एक, दोन नाही तर ३६५ पदार्थांचं केळवण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:59 PM2022-01-17T13:59:49+5:302022-01-17T15:09:12+5:30

Family arranges grand feast for future son in law with 365 dishes : अस्सं सासर सुरेख बाई! भावी जावयासाठी मुलीकडच्यांनी केलं एक, दोन नाही तर ३६५ पदार्थांचं केळवण

Andhra pradesh family arranges grand feast for future son in law with 365 dishes watch viral videos | जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी

जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी

(Image credit- India Today) 

संक्रांत आंध्र प्रदेशातही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भोगी-संक्रांती-कनुमा साजरी करण्यासाठी आपल्या मूळ ठिकाणी परतणारी कुटुंबे यात दिसतात. पश्चिम गोदावरीच्या परिसरातील नरसापुरममधील एका कुटुंबाने हा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला अन् सोशल मीडियवर चर्चेचा विषय ठरले. एखाद्या ठिकाणी केळवणाला गेल्यानंतर मेजवानी असतेच हे तुम्ही ऐकून असाल. व्हायरल व्हिडीओमधील कुटुंबानं त्यांच्या भावी जावयासाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली आणि हा मेन्यू खूपच लांबलचक होता.  (Andhra pradesh family arranges grand feast for future son in law )

जावयासाठी आयोजित केलेल्या या शाही मेजवानी मेनूमध्ये 365 लज्जतदार पदार्थांचा समावेश होता.  तेलुगू परंपरेत, जावयाला सणासाठी आमंत्रित करण्याची प्रथा आहे आणि या कुटुंबाने 365 पदार्थ तयार करून आपल्या भावी जावयावरचं प्रेम व्यक्त केलं.  या आगळ्या वेगळ्या मेन्यूमध्ये 30 विविध प्रकारच्या करी, भात, बिर्याणी, पुलिहोरा, 100 विविध प्रकारच्या पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण मिठाई, 15 प्रकारचे आइस्क्रीम, पेस्ट्रीज, केक, गरम आणि थंड पेये आणि फळं यांचा समावेश होता.

कृष्णा जिल्ह्यातील रहिवासी टी. सुब्रह्मण्यम आणि अन्नपूर्णा यांनी त्यांचा मुलगा साईकृष्णाचा विवाह सोन्याचे व्यापारी अत्यम व्यंकटेश्वर राव  यांची कन्या  कुंदवी हिच्याशी ठरवला. वधूचे आजोबा अचंता गोविंद आणि आजी नागमणी यांनी  नात जावयाचे आणि कुटुंबियांचे भव्य स्वागतही केले. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत लांबलचक केळीच्या पानातील पदार्थ लक्ष वेधून घेत आहेत. 

Web Title: Andhra pradesh family arranges grand feast for future son in law with 365 dishes watch viral videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.