Bone fracture : उन्ह तापायला लागल्यावर उन्हाच्या प्रखर किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी तरूणी किंवा महिला कितीतरी गोष्टींचा वापर करतात. गॉगल, दुपट्टा बांधून लांब बाह्यांचे कपडे घालून म्हणजे जवळपास पूर्ण शरीरच झाकून बाहेर पडतात. उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग होऊ नये हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
उन्हाच्या नुकसानकारक यूव्ही किरणांमुळे त्वचेचं नुकसान होतं, यात काहीच दुमत नाही. पण याचा अर्थ असा नाही की, त्वचेच्या काळजीच्या नादात तुम्ही उन्हच घेऊ नये. कारण जर शरीरात उन्ह मिळालं नाही तर शरीरात व्हिटामिन डी चं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे हाडं कमजोर होतात आणि मोडूही शकतात.
बेडवर फिरली अन् मोडलं हाड
उन्हापासून टॅनिंगची समस्या होऊ नये यासाठी महिलेनं घेतलेली काळजीच तिला खूप महागात पडली. चीनमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेत असताना एका कुशीवर वळताच महिलेचं हाड मोडलं. डॉक्टरांनुसार, याचं कारण अनेक वर्षांपासून उन्हापासून वाचण्याची तिची सवय आहे.
अनेक वर्ष उन्ह घेतलंच नाही
चीनच्या सिचुआन प्रांताच्या चेंगदू शहरातील ही घटना आहे. SCMP च्या रिपोर्टनुसार, महिला नेहमीच उन्हापासून स्वत:चा बचाव करत होती. नेहमीच त्वचा गोरी ठेवण्यासाठी आणि टॅनिंग टाळण्यासाठी ती शरीर पूर्ण झाकूनच बाहेर पडत होती. पण याच सवयीमुळे तिच्या शरीरात व्हिटामिन डी कमी खूप कमी झालं होतं.
व्हिटामिन डी आपल्या शरीरात कॅल्शिअमचं अवशोषण आणि हाडं मजबूत करण्याचं काम करतं. जेव्हा महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा टेसट केली गेली. तेव्हा समजलं की, तिला गंभीर ऑस्टियोपोरोसिस झाला आहे. म्हणजे तिची हाडं खूप जास्त कमजोर झाली आहेत. त्यामुळे कुशीवर वळताच तिचं हाड मोडलं.
उन्हापासून त्वचेचा बचाव केलाच पाहिजे. पण इतकाही करू नये की, तुम्हाला नंतर महागात पडेल. रोज सकाळी काही वेळ उन्हात बसूनही तुम्ही व्हिटामिन डी मिळवू शकता. आजकाल 30 वयानंतरच महिलांच्या हाडांमधून कॅल्शिअम कमी होऊ लागतं. अशात हाडं मजबूत करण्यासाठी व्हिटामिन डी असलेले फूड्स खाण्यासोबतच पुरेशी उन्हही घेतली पाहिजे.