Lokmat Sakhi >Social Viral > अरे बापरे!! तिला म्हणे प्रत्येक चेहऱ्यात राक्षस दिसायचा? पाहा त्यामागचं भयानक कारण...

अरे बापरे!! तिला म्हणे प्रत्येक चेहऱ्यात राक्षस दिसायचा? पाहा त्यामागचं भयानक कारण...

Social Viral: नेदरलँडमधल्या एका महिलेची ही खरीखुरी गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे...(woman kept seeing dragons instead of humans for 52 years)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 09:20 IST2025-08-30T09:15:05+5:302025-08-30T09:20:01+5:30

Social Viral: नेदरलँडमधल्या एका महिलेची ही खरीखुरी गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे...(woman kept seeing dragons instead of humans for 52 years)

woman kept seeing dragons instead of humans for 52 years | अरे बापरे!! तिला म्हणे प्रत्येक चेहऱ्यात राक्षस दिसायचा? पाहा त्यामागचं भयानक कारण...

अरे बापरे!! तिला म्हणे प्रत्येक चेहऱ्यात राक्षस दिसायचा? पाहा त्यामागचं भयानक कारण...

Highlightsतिला अगदी लहानपणापासून हा त्रास व्हायचा. एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर सुरुवातीला ती त्याला व्यवस्थित ओळखायची. पण नंतर मात्र.....

जेव्हा एखादी व्यक्ती खूप क्रुर, निर्दयी कृत्य करते तेव्हा तिच्याबाबत बोलताना माणसाच्या रुपातील राक्षस किंवा राक्षसी वृत्ती असं आपण म्हणतो. पण नेदरलँडमधली एक महिला अशी आहे की तिला अगदी अलिकडच्या काळापर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये राक्षस दिसायचा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिच्याशी वाईट वागायची असं नाही. पण तिला माणसांच्या चेहऱ्यामध्ये राक्षसी चेहऱ्याचा भास व्हायचा. त्यामुळे तिला कोणाशीही बोलण्याची, बाहेर जाण्याची प्रचंड भीती वाटायची. तिला असं का व्हायचं आणि त्यामागची कारणं काय होती याविषयीची माहिती The Lancet या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.(woman kept seeing dragons instead of humans for 52 years)

 

त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की वयाच्या बावन्नाव्या वर्षीपर्यंत त्या महिलेला असाच त्रास होत होता. शेवटी खूपच असह्य झाल्यावर २०११ साली ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

गौराईच्या सणाला केसांत माळा गुलाब पाकळ्यांचा देखणा गजरा, पाहा गजरा करण्याची सोपी पद्धत

तिला अगदी लहानपणापासून हा त्रास व्हायचा. एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर सुरुवातीला ती त्याला व्यवस्थित ओळखायची. पण नंतर मात्र त्या व्यक्तीमध्ये काही बदल होतो आहे असं तिला  दिसायला लागायचं आणि त्या ओळखीच्या व्यक्तीलाही ती नंतर घाबरू लागायची.

गणपतीला वाहिलेल्या फुलांचं काय करायचं? निर्माल्यापासून घरीच तयार करा ‘असं’ खत, बाग फुलेल छान

त्या महिलेला Prosopometamorphopsia हा मानसिक आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असून तो मेंदुशी संबंधित आहे. अशी काही भीती कधी वाटू लागली किंवा असे भास होऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही त्या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

 

Web Title: woman kept seeing dragons instead of humans for 52 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.