Pregnancy Viral News : प्रेग्नेन्सी किंवा डिलेव्हरीसंबंधी अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. पण ऑस्ट्रेलियामधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे २० वर्षीय चार्लोट समर्सने प्रेग्नेन्सीची माहिती मिळाल्यावर काही तासांमध्ये बाळाला जन्म दिला.
चार्लोटला ती प्रेग्नेन्ट असल्याची माहिती बाळाच्या जन्माच्या केवळ १७ तासांआधी मिळाली होती. जेव्हा डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड केलं तर समजलं की, ती गेल्या ८ महिन्यांपासून गर्भवती आहे. डॉक्टरांनी याला 'क्रिप्टिक प्रेग्नेन्सी' म्हटलं. ज्यात प्रेग्नेन्सीची लगेच माहिती मिळत नाही.
याप्रकारच्या प्रेग्नेन्सीला 'क्रिप्टिक प्रेग्नेन्सी' म्हटलं जातं. ज्यात महिलेला शेवटपर्यंत समजत नाही की, ती गर्भवती आहे. अशा केसेसमध्ये मासिक पाळीसारखं ब्लीडिंग होत राहतं आणि पोट जास्त वाढत नाही. तसेच बाळांची हालचालही जाणवत नाही. वजनातही जास्त फरक पडत नाही.
चार्लोटला वाटत होतं की, फक्त तिचं थोडं वजन वाढलं आहे आणि जीन्स टाइट होत आहे. हे तणावामुळे किंवा रिलेशनशिपमध्ये असल्यानं झाल्याचं तिला वाटलं. ती नेहमीचेच कपडे वापरत होती आणि गर्भनिरोधक गोळ्याही घेत होती. चार्लोट ६ जूनला एका डॉक्टरांकडे ग्लटेन सेन्सिटिविटीची टेस्ट करण्यासाठी गेली होती. पण डॉक्टरांनी तिची प्रेग्नेन्सी टेस्टही केली आणि ती पॉझिटिव्ह आली.
नंतर जेव्हा अल्ट्रासाउंड केलं तर डॉक्टरही अचंबित झाले. ती ३८ आठवडे आणि ४ दिवसांची प्रेग्नेन्ट होती. चार्लोटला लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. कारण तिच्या पोटात पाणी कमी होतं. त्यानंतर लेबर पेन प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि केवळ सात मिनिटांमध्ये तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. चार्लोट म्हणाली की, सगळंकाही अचानक झालं, मला काहीच सुचत नव्हतं. मी बेशुद्ध पडले होते आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा बाळ माझ्या कुशीत होतं.