Lokmat Sakhi >Social Viral > भलतंच काहीतरी! सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा महिलेचा अजब दावा, डॉक्टर म्हणाले, हा तर...

भलतंच काहीतरी! सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा महिलेचा अजब दावा, डॉक्टर म्हणाले, हा तर...

Social Viral : डॉक्टरांच्या तपासणीत सगळं काही स्पष्ट झालं आहे. मुळात ज्या गोष्टीला सापांची पिल्लं म्हटलं जात आहे, ती सापाची पिल्लं नाहीतच.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:48 IST2025-08-08T12:21:07+5:302025-08-08T12:48:06+5:30

Social Viral : डॉक्टरांच्या तपासणीत सगळं काही स्पष्ट झालं आहे. मुळात ज्या गोष्टीला सापांची पिल्लं म्हटलं जात आहे, ती सापाची पिल्लं नाहीतच.

Woman claims to give birth to snake, doctor clears is it possible or not | भलतंच काहीतरी! सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा महिलेचा अजब दावा, डॉक्टर म्हणाले, हा तर...

भलतंच काहीतरी! सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा महिलेचा अजब दावा, डॉक्टर म्हणाले, हा तर...

Social Viral : मध्य प्रदेशातील एक विचित्र घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. येथील एका महिलेने अजब दावा केला आहे की, तिने सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिलाय (Women Claim Giving Birth Snake). ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीत सगळं काही स्पष्ट झालं आहे. मुळात ज्या गोष्टीला सापाची पिल्लं म्हटलं जात आहे, ती सापाची पिल्लं नाहीतच. चला तर पाहुयात काय आहे नेमकी भानगड...

काय आहे घटना?

मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील मउमसानिया गावातील ही घटना आहे. इथे महिलेने केलेल्या तीन सापांच्या पिल्लांना जन्म देण्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. लोकांना याबाबत समजताच, महिलेच्या घरी लोकांनी एकच गर्दी केली. लोकांनी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेत. व्हिडिओत महिलेजवळ सापासारखं काहीतरी दिसत आहे. ही गोष्टी प्लास्टिकच्या टबानं झाकली आहे. महिलेनं दावा केला की, तिनं सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला. पण खरंच असं शक्य आहे का? याबाबत डॉक्टरांनी खुलासा केला आहे.

डॉक्टरांनी सांगितलं सत्य

महिलेच्या दाव्याबाबत पूर्ण सत्य डॉक्टरांच्या तपासणीतून समोर आलं आहे. बीएमओ डॉ. अवधेश चतुर्वेदी यांनी सांगितलं की, महिला गर्भवती नव्हती. ती ज्या गोष्टीला सापाची पिल्लं समजत आहे त्या ब्लड क्लॉट्स म्हणजे रक्ताच्या गाठी आहेत. डॉक्टरांनी हेही सांगितलं की, अल्ट्रासाऊंडनंतर याचं नेमकं कारणही समोर येईल.

डॉक्टरांनुसार हे जैविक रूपानं शक्य नाही की, महिला सापासारख्या जीवाला जन्म देऊ शकेल. वेळीच तपासण्या करून अफवा आणि अंधश्रद्धेवर पडदा टाकण्यात आला आहे.

Web Title: Woman claims to give birth to snake, doctor clears is it possible or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.