Join us

Woman Beat Up Security Guard : संतापजनक! कुत्र्याला मारलं म्हणून महिलेनं सिक्युरिटी गार्डला चोपचोप चोपलं; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 19:52 IST

Woman Beat Up Security Guard : कुत्र्याला मारलं म्हणून महिलेनं सिक्युरिटी गार्डला चोपचोप चोपलं; पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओज पाहत असाल, ज्यात महिला आणि पुरूषांची भांडणं समोर येतात. काही दिवसांपूर्वी नोएडाच्या एका रिक्षा चालकाला महिलेनं चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा  सिक्युरिटीला एका महिलेचा मार खावा लागला आहे. हा व्हिडिओ आग्र्यााचा असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबी ड्रेसमधली एक महिला सिक्युरिटी गार्डला मारहाण करताना दिसत आहे.  (Viral video woman beat up security guard in agra video goes viral on social media)

समोर आलेल्या माहितीनुसार सिक्युरिटी गार्ड आणि या महिलेच कुत्र्यावरून वाद झाला. महिलेला राग अनावर झाल्यानं तिनं सिक्युरिटी गार्डला आधी शिव्या दिल्या. सिक्युरिटी गार्डनं उलट उत्तर दिल्यानंतर महिलेला जास्तच राग आला अन मग तिनं त्याला चोपचोप चोपलं. या व्हिडिओमध्ये या महिलेसोबत इतरही काही महिला दिसत आहेत. आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला. 

सिक्युरिटी गार्डनं मला काठीनं मारल्याचं सांगत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.  आपल्या मर्यादा ओलांडून एखाद्याशी वागणं चुकीचं असल्याची कमेंट एका युजरनं केली आहे. तुम्हाला मारण्याचा काहीही अधिकार नाही अशा शब्दात या महिलेची कानउघडणी नेटिझन्सनी केली आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल