Join us

Woman Acid Attacks : ब्रेकअप झालं अन् तिचं डोकं सटकलं, तरुणीने केला तरुणावर ऍसिड हल्ला! सोशल मीडियातली 'अशीही' लव्ह- हेट स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 15:45 IST

Woman Acid Attacks : दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे सांगितल्यानंतर ती असं काही करेल याची त्याला कल्पनाही नव्हती. तिनं फोन करून नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावलं अन् मग...

(Image Credit- Mathrubhumi.com)

ब्रेकअपनंतर खूप मानसिक त्रास  करावा लागतो याची तुम्हाला कल्पना असेलच, पण या धक्क्यातून सावरणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. (Breakup girl friend acid attack) काहीजण स्वत:ला त्रास करून घेतात तर काहीजण एक्स पार्टनरवर सूड उगवण्यासाठी कोणत्याही थराला जातात.

अशीच एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर समोर आली आहे.  ब्रेकअप झाल्यानंतर महिलेनं एसिड हल्ला केला आहे. यात पीडित तरूणाला त्याचा डोळा गमवावा लागला. सध्या  पीडित तरूणावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची अवस्था फारच  गंभीर आहे. (Woman attacks youth with acid in Idukki)

मातृभूमी डॉट कॉम ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार केरळच्या (Kerala) इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील आदिमाली येथे विचित्र प्रकार समोर आला आहे. अरूण कुमार (Arun Kumar) नावाच्या तरूणावर ३५ वर्षीय शीबा (Sheeba) नावाच्या महिलेनं एसिड अटॅक (Acid Attack) केला आहे. 16 नोव्हेंबरला सदर घटना घडली असून सध्या तिरूवनंतपूरमच्या खासगी रुग्णालयात जखमी तरूणावर उपचार सुरू आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार तिरूवनंतपुरम जिल्ह्यातील रहिवासी अरूण कुमारवर आदीमाली इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षांच्या शीबानं एसिड हल्ला केला. या  हल्ल्यात तरूणाला आपला डोळा कायमचा गमवावा लागला. शीबा अरूण कुमारची गर्लफ्रेंड होती आणि ब्रेकअप झाल्यानंतर तिचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सांगितलं जात आहे. 

अरूण कुमार आणि शीबा यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. आधी मैत्री नंतर त्यांचे एकमेकांसह प्रेम जुळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीबा, अरूण कुमारच्या दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे नाराज होती. याच कारणामुळे  रागाच्या भरात तिनं गंभीर गुन्हा केला. 

 १६ नोव्हेंबरला मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता तिनं अरूण कुमारला  इरूम्पुपलम चर्चजवळ म्हणजेच नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावलं. आरोपांनुसार शीबानं त्याचवेळी अरूण कुमारवर एसिड फेकलं. एसिडच्या काही थेंबांनी शीबाचा चेहरा आणि  हातसुद्धा जळाला.   

टॅग्स :सोशल व्हायरलगुन्हेगारीकेरळ