उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकाच्याच घरी एसी सुरू असतो. कारण वातावरणात इतकी उष्णता वाढलेली असते की प्रत्येकालाचा गारवा हवा असतो. फक्त पंखा लावून इतका आराम मिळत नाही. बरेच लोक ज्या खोलीत एसी असतो तिथे पाण्याची बादली भरून ठेवतात. तुम्हाला ऐकून थोडं नवल वाटेल पण यामागे मोठं कारण दडलेलं आहे. याबाबत सविस्तर समजून घेऊ. (Why To Keep Bucket Of Water In Rooms While Ac Is Running Know Reason And Way To Keep)
एसी असलेल्या खोलीत लोक पाण्याची बादली का भरून ठेवतात? उन्हाळ्याच्या दिवसांत खोली थंड करण्यासाठी एअर कंडीशनर उत्तम आहे. कारण यामुळे खोलीतील मॉईश्चर शोषून घेतले जाते. रोज एसी लावल्यामुळे खोली एकदम कोरडी वाटते आणि हवाही कोरडी होते. यामुळे फक्त त्वचा खराब होत नाही तर आरोग्यालाहीधोका असतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत नाही तर पाण्याची बादली भरून ठेवतात. ही पद्धत थोडी विचित्र वाटते पण हा कमालीचा उपाय आहे ज्यामुळे खूप मदत होते.
नॅच्युरल ह्युमिडिफायरचं काम करते पाण्याची बादली
खोलीत खूप वेळ एसी सुरू ठेवल्यामुळे खोलीत ड्रायनेस येतो. ज्यामुळे त्वचा कोरडी होते. अशा स्थितीत जेव्हा तुम्ही खोलीत पाण्याची बादली भरून ठेवता तेव्हा पाणी हळूहळू हवेत मिसळायला सुरूवात होते. पाण्याची बादली नॅच्युरल ह्युमिडीफायरप्रमाणे काम करते ज्यामुळे त्वचा ड्राय होत नाही आणि घसा कोरडाही पडत नाही. याशिवाय त्वचाही हेल्दी राहते आणि झोप चांगली येते.
पाणी भरून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?
पाण्यानं भरलेली बादली अशा ठिकाणी ठेवा जिथे एसीच्या हवेचे सर्क्युलेशन व्यवस्थित असते. पाण्याची बादली नेहमी सुरक्षित कोपऱ्यात ठेवा जिथे कोणाचाही पाय किंवा धक्का लागणार नाही.
पाण्याची बादली झाकून ठेवू नका.
पाणी जितकं हवेच्या संपर्कात येईल तितकंच चांगले ह्युमिडीफायर बनेल. बादलीतील पाणी सवच्छ असायला हवं. याव्यतिरिक्त बादलीतील पाणी रोज बदला पाण्याची बादली इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर ठेवा ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका उद्भवणार नाही.
Web Summary : Keeping a water bucket in AC rooms combats dryness. It acts as a natural humidifier, preventing skin dryness and throat irritation, promoting better sleep. Place it safely in the airflow, uncovered, and change the water daily.
Web Summary : एसी कमरों में पानी की बाल्टी रखने से सूखापन दूर होता है। यह प्राकृतिक ह्यूमिडिफायर के रूप में कार्य करता है, त्वचा को सूखने और गले में खराश से बचाता है, जिससे बेहतर नींद आती है। इसे हवा में सुरक्षित रूप से रखें, खुला रखें और पानी को प्रतिदिन बदलें।