Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > मॉल किंवा दुकानातून आणलेले नवेकोरे कपडे न धुता लगेच घातले तर बघा काय होतं..

मॉल किंवा दुकानातून आणलेले नवेकोरे कपडे न धुता लगेच घातले तर बघा काय होतं..

Is it okay to wear new clothes without washing : अनेकदा असा प्रश्न पडतो की, नवीन कपडे न धुता घालावेत की नाही? असं केल्यास काय होऊ शकतं? हेच आज आपण पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:41 IST2026-01-22T15:28:26+5:302026-01-22T15:41:12+5:30

Is it okay to wear new clothes without washing : अनेकदा असा प्रश्न पडतो की, नवीन कपडे न धुता घालावेत की नाही? असं केल्यास काय होऊ शकतं? हेच आज आपण पाहणार आहोत.

Why should we wash new clothes before wearing | मॉल किंवा दुकानातून आणलेले नवेकोरे कपडे न धुता लगेच घातले तर बघा काय होतं..

मॉल किंवा दुकानातून आणलेले नवेकोरे कपडे न धुता लगेच घातले तर बघा काय होतं..

Is it okay to wear new clothes without washing : नवीन कपडे घेणं ते लगेच घालणं अनेकांची सवय असते. नवीन कपडे खरेदी करताच ते लगेच घालावेत, असं अनेकांना वाटतं. नवी शर्ट, ड्रेस किंवा जीन्स पाहताच उत्साह इतका वाढतो की धुण्याचा विचारच मनात येत नाही. कपडे दिसायला अगदी स्वच्छ आणि चकचकीत असल्यामुळे ते थेट घालायला हरकत नाही, असा विचार केला जातो. पण अनेकदा अनेकांना असा प्रश्न पडतो की, नवीन कपडे न धुता घालावेत की नाही? असं केल्यास काय होऊ शकतं? हेच आज आपण पाहणार आहोत.

प्रत्यक्षात हे नवीन कपडे कारखान्यापासून दुकानापर्यंत अनेक हातांमधून आणि ठिकाणांमधून जातात. या प्रवासात त्यावर केमिकल्स, धूळ आणि हलके कीटाणू साचू शकतात. म्हणूनच स्किन आणि हेल्थ तज्ज्ञ नवीन कपडे घालण्यापूर्वी धुण्याचा सल्ला देतात, जेणेकरून त्वचा सुरक्षित राहील आणि कोणतीही अडचण उद्भवणार नाही.

नवीन कपडे घातल्याने आजार होतो का?

नवीन कपडे घातल्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता फारच कमी असते. दुकानात एखाद्याने ते कपडे ट्राय केले असतील तरीही इन्फेक्शन होण्याचा धोका नसतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र, काही लहान कारणांमुळे खबरदारी घेणं योग्य मानलं जातं.

रंग उतरायचा धोका

कपडे तयार करताना त्यांना रंग दिला जातो. अनेकदा हा रंग पूर्णपणे सेट झालेला नसतो. न धुता रंगीत कपडे घातल्यास त्याचा रंग इतर कपड्यांवर चढू शकतो. पहिल्यांदा धुतल्याने अतिरिक्त रंग निघून जातो आणि कपडे सुरक्षित राहतात.

कपड्यांमधील केमिकल्स

कपड्यांच्या प्रोसेसिंगमध्ये विविध प्रकारचे केमिकल्स वापरले जातात, खासकरून पॉलिएस्टर आणि नायलॉनसारख्या सिंथेटिक कपड्यांमध्ये. हे केमिकल्स त्वचेवर खाज, जळजळ किंवा अ‍ॅलर्जी निर्माण करू शकतात. धुतल्याने हे केमिकल्स मोठ्या प्रमाणात निघून जातात.

कीटाणू आणि घाण

नवीन कपडे कारखाना, गोदाम, वाहतूक आणि दुकान अशा अनेक ठिकाणांहून येतात. या दरम्यान त्यावर धूळ आणि बॅक्टेरिया साचू शकतात. धुण्याने ही घाण साफ होते आणि त्वचा सुरक्षित राहते.

बुरशी आणि ओलावा

काही कपडे बराच काळ बंद कंटेनरमध्ये ठेवलेले असतात. दमट वातावरणात त्यावर बुरशी लागू शकते, जी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच नवीन कपडे घालण्यापूर्वी त्यांची धुलाई करणं आवश्यक आहे.

Web Title : नए कपड़े: धोकर पहनें या नहीं? जोखिमों को समझें

Web Summary : नए, बिना धुले कपड़े पहनने से त्वचा में जलन हो सकती है। उत्पादन और परिवहन के दौरान रंग, रसायन और बैक्टीरिया लग सकते हैं। धोने से ये तत्व हट जाते हैं, जिससे स्वास्थ्य जोखिम और रंग निकलने का खतरा कम होता है।

Web Title : New Clothes: Wash or Wear? Potential Risks Explained Simply

Web Summary : Wearing new, unwashed clothes may cause skin irritation due to dyes, chemicals, and bacteria picked up during manufacturing and transport. Washing removes these irritants, reducing potential health risks and color transfer, ensuring safer wear.