Join us

घराच्या दारावर हिंग बांधून का ठेवतात? हिंगाचे आहारातले महत्त्व मोठे, आरोग्यासाठी गुणकारी कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:57 IST

Astro Benefits of Hing : अनेकांना हे माहीत नसतं की, अशाप्रकारे दरवाज्यावर हिंग बांधून ठेवल्यानं काय होतं? याबाबत एक्सपर्टचं काय मत आहे?

Astro Benefits of Hing : काही एक प्रचलित समज असा आहे की हिंग जर दारावर कपड्यात बांधून ठेवला तर त्यामुळे घराला दृष्ट लागत नाही. त्यात वैज्ञानिक काही नसलं तरी हिंगाचा आहारात वापर, लहान बाळांच्या पोटाला हिंगाचा लेप लावणं आणि मोठ्यांच्या आहारात तो असणं यानं मात्र तब्येतीला फायदा होऊ शकतो. 

सामान्यपणे अनेक औषधी गुण असलेला हिंग घराघरांमध्ये असतोच. हिंगाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आधी घरातील वृद्ध लोक लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हिंग कापडामध्ये बांधून घराच्या दरवाज्यावर बांधत होते.  घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर घराच्या दरवाज्यावर कापडात हिंग बांधून ठेवावा असा एक प्रचलित समज आहे. हिंगाच्या उग्र गंधामुळे त्रासदायक किटक घरात येत नाही किंवा इन्फेक्शन कमी होते असे मानले जाते. घरात समृद्धी येते असेही मानतात. अर्थात हे सगळे समज याला वैज्ञानिक आधार कुठलाही नाही त्यामुळे त्याचे ठोस समर्थन करता येत नाहीच.

आरोग्य चांगलं राहतं

हिंगाने पचन चांगले होते. गॅसेसचा त्रास होत नाही. स्वयंपाकात स्वाद वाढतो त्यामुळे हिंग अत्यंत औषधी मानला जातो. आरोग्यासाठी हिंग आहारात असणं उत्तम.

मानसिक तणाव दूर होतो

 आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. हिंगामुळे तणाव कमी होतो, पोटाचे विकार दूर राहतात त्यामुळे त्याही औषधात त्याचा वापर दिसतो.

टॅग्स :सोशल व्हायरलहेल्थ टिप्स