कमी- जास्त प्रमाणात का असेना पण रोजच्या रोज स्वयंपाक प्रत्येक घरातच होतो. शहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी शेगडीच प्रामुख्याने वापरली जाते. मदतीला इंडक्शन, मायक्रोवेव्ह अशी उपकरणं असली तरीही गॅसचा वापरच जास्त असतो. आता सर्वसामान्यपणे शेगडी पेटविल्यानंतर जी फ्लेम दिसते ती निळसर रंगाची असणं अपेक्षित असतं. पण बहुतांश घरांमध्ये बऱ्याच वेळा असं दिसून येतं की गॅसची फ्लेम पिवळट किंवा लालसर रंगाची झालेली आहे. ही गोष्ट आपल्याला वरवर सामान्य वाटत असली तरी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला मात्र त्यामुळे बराच त्रास होऊ शकतो. तो नेमका काेणता ते पाहा..(Why Do Gas Burner Flame Turns In Yellow And Orange Colour?)
गॅस शेगडीची फ्लेम पिवळट, लाल का दिसते?
गॅस शेगडीची फ्लेम पिवळट, लाल दिसण्यामागे हे ही एक कारण असतं की तुमचं गॅस सिलेंडर आता संपत आलेलं आहे.
४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग नेहमीच बहरलेली राहतील..
पण तुम्ही नुकतंच नवं सिलेंडर लावलेलं असेल आणि तरीही गॅस शेगडीची फ्लेम लालसर, पिवळी दिसत असेल तर त्यामागे नेमकं काय कारण असू शकतं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ amar_and_anu_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की शेगडीच्या बर्नरमधून जर गॅस लीक होत असेल तर फ्लेमचा रंग पिवळसर किंवा केशरी रंगाचा दिसत जातो. यामधून कार्बन डाय ऑक्साईडही जास्त प्रमाणात बाहेर पडतो.
बोअरवेलच्या पाण्यामुळे बादल्यांवर पांढरे डाग पडले? २ सोपे उपाय- ५ मिनिटांत बादली चकाचक
स्वयंपाक करणारी व्यक्ती कार्बन डाय मोनोक्साईडच्या संपर्कात जास्त वेळ राहात असल्याने तिला दमा, अस्थमा यासारखा त्रासही होऊ शकतो. शिवाय डोकेदुखी, डोळ्यांना जळजळ होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, असाही त्रास जाणवतो. त्यामुळे शेगडीचे बर्नर वेळोवेळी स्वच्छ करून घेणे हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे.