Garlic in Toilet Trend : हल्ली सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. कधी हे आरोग्याशी संबंधित असतात, तर कधी घराच्या स्वच्छतेबाबत असतात. ज्यातील काही ट्रेंड खरंच बरेच उपयोगी असतात. सध्या एक ट्रेंड चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. तो म्हणजे लोक कमोडमध्ये लसणाच्या कळ्या फ्लश करत आहेत. घरात केमिकल कमी वापरणारे लोक हा ट्रेंड अधिक फॉलो करत आहेत. काही लोकांचं मत आहे की, लसणाने टॉयलेटची दुर्गंधी कमी होते. तसेच पाइपलाईनमधील कीटक-मुंग्या सुद्धा दूर होतात.
मुळात टॉयलेटमध्ये लसणाच्या कळ्या टाकण्याचं कारण त्याचा तिखट गंध आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की, लसणाच्या गंधाने टॉयलेटच्या आजूबाजूचे कीटक, बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत मिळते. काही लोकांना असंही वाटतं की, लसणाच्या कळ्यांनी टॉयलेटची दुर्गंधी सुद्धा कमी होते. त्यामुळे बरेच लोक रात्री झोपण्याआधी लसणाच्या कळ्या टॉयलेटमध्ये फ्लश करतात. पण फॅक्ट हे आहे की, लसणाच्या कळ्यांचा गंध केवळ फायदेशीर ठरतो. याने टॉयलेट किंवा ड्रेन पूर्णपणे स्वच्छ होत नाही किंवा बॅक्टेरिया मरत नाहीत. जर बाथरूममध्ये ओलावा, दुर्गंधी किंवा घाण असेल तर बाथरूमची नियमितपणे स्वच्छता केली पाहिजे. केवळ लसणाच्या कळ्या कमोडमध्ये फ्लश करून काही होणार नाही.
काही लोक लसणाच्या कळ्यांचा वापर यामुळेही करतात की, लसूण हा एक केमिकल फ्री उपाय आहे. ज्या लोकांना केमिकल्सचा वास आवडत नाही, ते लसणाकडे नॅचरल, हलका आणि सोपा उपाय म्हणून बघतात. लसणामुळे बाथरूममध्ये एक वेगळाच गंध येतो, जो काही लोकांना आवडतो. काही लोक तर लसणाच्या कळ्या फ्लश करण्याऐवजी लसणाचं पाणी किंवा चहा बनवून टॉयलेटमध्ये टाकतात. त्यांचं मत असतं की, लसणाच्या पाण्याने किंवा चहाने टॉयलेटमधील डागही कमी होतात. पण असं काही नाहीये.
मुळात कधी कधी लसणाच्या कळ्या टॉयलेटमध्ये टाकणं काही वाईट नाही. पण रोज असं करणं टाळलं पाहिजे. कारण टॉयलेट किंवा पाइपलाईन खाण्या-पिण्याच्या गोष्टी टाकण्यासाठी नसतात. असं नेहमीच केल्याने पाइपलाईन ब्लॉक होण्याचा धोका असतो. जर टॉयलेटची दुर्गंधी किंवा बाथरूममधील कीटाणू मारायचे असतील तर इतरही अनेक योग्य उपाय आहेत. योग्यपणे आणि नियमित टॉयलेटची स्वच्छता करणं गरजेचं आहे. लसणाच्या कळ्या फ्लश करणं हा एक छोटा घरगुती उपाय आहे, ज्याकडे पूर्ण समाधान म्हणून बघणं चुकीचं ठरेल.
