आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळं समाविष्ट केल्याने शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. डॉक्टर सर्व वयोगटातील लोकांना दररोज किमान एक किंवा दोन फळं खाण्याचा सल्ला देतात. फळं खरेदी करण्यासाठी आपण अनेकदा बाजारात जातो. संत्री, सफरचंद, पपई, पेरू आणि द्राक्षे अशी भरपूर फळं तिथे उपलब्ध असतात. तुम्ही पाहिलं असेल की, फळ विक्रेते काही फळं ही नेहमी कागदात किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून त्यांच्या टोपल्यांमध्ये ठेवतात. ते असं का करत असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागील कारणं जाणून घेऊया...
फळं कागदात का गुंडाळून ठेवली जातात?
– फळं कागदात गुंडाळल्याने ती सुरक्षित आणि ताजी राहतात. याच्या मदतीने तुम्ही फळं जास्त काळ साठवून ठेवू शकता.
- कधीकधी फळं थेट उन्हात ठेवल्याने ती लवकर खराब होऊ शकतात. वर्तमानपत्र हे इन्सुलेटरसारखं रिएक्ट करतं, त्यामुळे फळं उष्ण तापमानात खराब होत नाहीत.
- जर पिकलेली फळं कागदात व्यवस्थित गुंडाळली तर ती धक्का किंवा सतत हात लावल्यानंतर खराब होत नाहीत.
- काही लोक फळांना नख लावून फळं पिकली आहेत की कच्ची आहेत हे तपासण्याचा प्रयत्न करतात. यापासून संरक्षण करण्यासाठी ती कागदात गुंडाळून ठेवणं हा योग्य मार्ग आहे.
- जर फळं कच्ची असतील तर ती कागदात गुंडाळल्याने ती लवकर पिकण्यास मदत होते. लोक सहसा कच्ची फळं खरेदी करत नाहीत. म्हणूनच फळ विक्रेते कच्चे पपई, संत्री, पेरू इत्यादी कागदात गुंडाळून ठेवतात.
- कागद हा बायोडिग्रेडेबल असल्याने फळांच्या पॅकेजिंगमध्ये त्याचा वापर केला जातो. प्लास्टिकच्या पॅकेजिंगमुळे पर्यावरणाची हानी होते.
- फळांना धूळ, घाण आणि जंतूंपासून वाचवण्यासाठी ती कागदामध्ये गुंडाळून ठेवणं हा सर्वोत्तम उपाय आहे.
- बऱ्याच वेळा ग्राहक स्वच्छतेची खूप काळजी घेतात. अशा परिस्थितीत, कागदात पॅक केलेली फळं पाहून ते त्याकडे लवकर आकर्षित होतात आणि ती स्वच्छ असल्याने लगेच खरेदी करतात.