Aluminium Foil Trick : सोशल मीडियावर आपण रोज असे काही व्हिडीओ बघत असतो ज्या लोक रोजच्या समस्या सोडवण्यासाठी काहीना काही भलतेच जुगाड करताना दिसतात. रोज घरा-दारातही काहीना काही बारीक-सारीक समस्या होतच असतात. या समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी भारतातील लोक जुगाड करण्यासाठी फेमस आहेत.
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी, हिवाळ्यात घर गरम ठेवण्यासाठी आणि पावसाळ्यात घर गळू नये म्हणून लोक काहीना काही आयडियाची कल्पना लावतात. अशीच घरातील एक समस्या दूर करण्यासाठी लोक आजकालच्या घराच्या बाल्कनीमध्ये अॅल्यूमिनिअमची फॉइल ठेवत आहेत. आता ती कशासाठी ठेवतात हे जाणून घेऊ.
सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटोंमध्ये लोक घराच्या बाल्कनीत अॅल्युमिनिअम फॉइल ठेवताना दिसत आहेत. मुळात अॅल्युमिनिअमनं घरात उष्णता वाढू शकते. पण लोक असं का करत आहेत? यामागचं कारण आपण जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यात पाणी आणि जेवणाच्या शोधात कबूतर आणि इतर पक्षी फिरत राहतात आणि घरांच्या बाल्कनीमध्येही येऊन बसतात. उन्हाळ्यात तुम्हाला सुद्धा घराच्या बाल्कनीत किंवा खिडक्यांवर कबूतर बसलेले दिसतात. पण कबूतरं आपलं काम वाढवून ठेवतात. बाल्कनीत ते घाण करून ठेवतात.
यापासून बचाव करण्यासाठीच लोक एक अॅल्युमिनिअमचा एक वेगळा जुगाड करत आहेत. ते बाल्कनीमध्ये अॅल्युमिनिअम फॉइल ठेवत आहेत. लोकांचं मत आहे की, हा उपाय केल्यानं कबूतर बाल्कनीत येत नाहीत
असं मानलं जातं की, अॅल्युमिनिअन फॉइलचा चमकदारपणा कबूतरांना आवडत नाही आणि तो बघूनच ते दूर पळून जातात. कारण त्यांच्या डोळ्यांना याचा त्रास होतो. सोशल मीडियावर ही ट्रिक सांगणाऱ्या अनेक पोस्ट समोर आल्या आहेत. असं असलं तरी सायंन्टिफिकली असं काही स्पष्ट नाही की, अॅल्युमिनिअम फॉइलनं कबूतर पळवण्यास मदत मिळते.