Lokmat Sakhi >Social Viral > किचन ट्रॉली अडकतेय, ओढताना जड जाते? फक्त २ गोष्टी करा, ट्रॉली सरकेल सहज

किचन ट्रॉली अडकतेय, ओढताना जड जाते? फक्त २ गोष्टी करा, ट्रॉली सरकेल सहज

Why Are Kitchen Drawers Or Trolley Hard To Open?: कधी कधी किचन ट्रॉली खूप जाम किंवा पक्क्या होऊन जातात. त्यासाठी घरच्याघरी काय उपाय करावा ते पाहूया..(what to do if kitchen trolley gets too much tight or hard?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 16:14 IST2025-05-05T16:00:56+5:302025-05-05T16:14:22+5:30

Why Are Kitchen Drawers Or Trolley Hard To Open?: कधी कधी किचन ट्रॉली खूप जाम किंवा पक्क्या होऊन जातात. त्यासाठी घरच्याघरी काय उपाय करावा ते पाहूया..(what to do if kitchen trolley gets too much tight or hard?)

Why are my kitchen drawers hard to open? what to do if kitchen trolley gets too much tight or hard | किचन ट्रॉली अडकतेय, ओढताना जड जाते? फक्त २ गोष्टी करा, ट्रॉली सरकेल सहज

किचन ट्रॉली अडकतेय, ओढताना जड जाते? फक्त २ गोष्टी करा, ट्रॉली सरकेल सहज

Highlightsकिचन ट्रॉली आत- बाहेर ढकलताना जर खूप जड होत असतील तर सगळ्यात आधी हे तपासून पाहा की तुम्ही तिच्यामध्ये गरजेपेक्षा जास्त सामान तर कोंबलेलं नाही ना?

किचन ट्रॉली हल्ली जवळपास प्रत्येक घरात दिसून येते. मग तो तुमचा अगदी १ बीएचके फ्लॅट असो किंवा मग प्रशस्त बंगला असो.. काही अपवाद सोडले तर जवळपास प्रत्येक घरी किचन ट्रॉली असतातच. कारण त्यांच्यामध्ये भरपूर सामान अगदी व्यवस्थित मावते आणि शिवाय ते वरून अजिबात दिसूनही येत नाही. पण बऱ्याचदा आपण ट्रॉलीमध्ये फक्त सामान ठेवत जातो आणि तिच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष करतो. यामुळे मग अशी वेळ येते की ट्रॉली खूप जड होते. तिला आत- बाहेर करायला बराच जोर द्यावा लागतो (Why Are Kitchen Drawers Or Trolley Hard To Open?). असं झालं तर ती घरच्याघरी कशी दुरुस्त करायची ते पाहुया.(what to do if kitchen trolley gets too much tight or hard?)

 

किचन ट्रॉली ओढायला खूप जड झाली असल्यास काय करावे?

१. किचन ट्रॉली आत- बाहेर ढकलताना जर खूप जड होत असतील तर सगळ्यात आधी हे तपासून पाहा की तुम्ही तिच्यामध्ये गरजेपेक्षा जास्त सामान तर कोंबलेलं नाही ना..

'या' पद्धतीने वापरून पाहा कॅस्टर ऑईल, पाेटाचे त्रास कमी होऊन सौंदर्यही खुलेल

कधी कधी तिच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाचं सामान तिच्यात भरपूर दिवस ठेवलं गेलं असेल तरीही ती जास्तीच्या ओझ्यामुळे जड होऊन जाते. त्यामुळे तिच्यामधलं सामान थोडं कमी करा आणि त्यासोबतच पुढे सांगितलेला उपायही नक्की करा.. 

 

२. दुसरा उपाय म्हणजे जी ट्रॉली जड झाली आहे तिच्यातले सगळे भांडे बाजूला काढून ठेवा. यानंतर ट्रॉलीच्या खालच्या बाजुने जो लोखंडी रॉड असतो तो एकदा साबणाच्या पाण्याने घासून स्वच्छ करून घ्या.

नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळलात? करा उकड शेंगोळ्यांचा बेत- घ्या अस्सल मराठी पारंपरिक रेसिपी 

यानंतर तो कपड्याने पुसून पुर्णपणे कोरडा झाल्यानंतर त्यावर खोबरेल तेल लावा. ट्रॉली आत- बाहेर जात असताना ज्या भागात तिचे घर्षण होते, त्या संपूर्ण भागात तेल सोडा. यानंतर मग १० मिनिटांनी ट्रॉली नेहमीप्रमाणे लावून टाका.  अगदी अलगदपणे ट्रॉली आत- बाहेर सरकली जाईल. हा उपाय महिन्यातून एकदा करायलाच हवा. 


 

Web Title: Why are my kitchen drawers hard to open? what to do if kitchen trolley gets too much tight or hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.