उन्हाळ्याच्या दिवसांत घरातील सर्वाधिक वापरलं जाणारं उपकरण म्हणजे पंखा (Ceiling Fan). बाहेरील उष्ण हवेपासून बचावासाठी पंखा हा उत्तम पर्याय ठरतो. आपल्या घरात असलेल्या पंख्यांना ३ पाते असतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. साधारणपणे अनेक भारतीय घरांमध्ये ३ पाते असलेला पंखा लावला जातो. काही ठिकाणी ४ पाते असलेला पंखासुद्धा वापरला जातो. ४ पाते असलेल्या पंखा पाश्चिमात्य देशात खूपच कॉमन आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का भारतातील पंख्याला ३ च पाते का असतात. (Why 3 Blades In India And 4 In The America)
पंख्याला ३ पाते का असतात? (Why Ceiling Fans Has 3 Blades In India)
पंख्याला ३ किंवा ४ पाते का असतात यामागे शास्त्रीय कारण आहे. लोकांना असं वाटतं की पंख्याला जितके जास्त पाते असतील तितकी हवा जास्त लागते पण असं अजिबात नाही. पंख्याच्या पात्याची संख्या जास्त असल्यामुळे हवा कमी होते. जितके कमी पाते असतात तितकीच जास्त हवा लागते.
भारतातील बऱ्याच प्रदेशात उष्ण वातावरण असते. पंखा लावण्याचं मुख्य कारण जास्त हवा येणं हे असते. अशा स्थितीत ३ पाते असलेला पंखा खूपच उपयोगी ठरतो कारण हा पंखा वेगानं फिरतो. अनेकदा खूप जास्त हवा देणाऱ्या आणि वेगात फिरणाऱ्या पंख्यांना फक्त २ च पाते असतात. म्हणूनच त्यातून जास्त वेगानं हवा येते.
परदेशात पंख्यांना ४ पाते का असतात? (Why 3 Blades Of Ceiling Fans In India And 4 In The Us)
लोकांना बऱ्याचदा प्रश्न पडतो की परदेशात भारतीय पंख्यांप्रमाणे 3 पात्यांचे पंखे का नसतात. तिथल्या पंख्यांना तीनचं पाते दिसून येतात. परदेशात पंख्याचा वापर हवा देण्यासाठी नाही तर व्हेंटीलेशनसाठी केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत तिथे एसी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अशावेळी पंखा असा पर्याय असतो जो एसीची हवा रुममध्ये पसरवण्याचं काम करतो. अमेरिकेसारख्या देशात भारताप्रमाणे उष्ण हवामान नसते. एअर कंडिशनरचा वापर जास्त केला जातो ज्यामुळे एअर सर्क्युलेशन चांगले राहते. 4 ते 5 ब्लेड्स असलेल्या पंख्यातून आवाज कमी येतो आणि शांतताही राहते.
पात्यांची संख्या आणि परफॉर्मेन्सचा काय संबंध
पंख्याला जितके जास्त ब्लेड्स तितकाच हवेचा वेग वाढतो. वेग कमी-जास्त होत असला तरी हवेचा फ्लो संतुलित राहतो. कमी पाते असलेले पंखे जास्त फिरतात आणि हवाही जास्त देतात.
Web Summary : Indian fans prioritize high airflow with 3 blades due to hot climate. American fans with 4 blades focus on ventilation and quieter operation, often used with AC.
Web Summary : भारतीय पंखे गर्म जलवायु के कारण 3 ब्लेड के साथ उच्च वायु प्रवाह को प्राथमिकता देते हैं। अमेरिकी पंखे 4 ब्लेड के साथ वेंटिलेशन और शांत संचालन पर ध्यान केंद्रित करते हैं, अक्सर एसी के साथ उपयोग किए जाते हैं।