सध्याच्या धकाधकीच्या काळात महिलांना घरकाम आणि ऑफिस दोन्ही व्यवस्थित सांभाळावे लागते. या सगळ्यात आपलं आरोग्य देखील निरोगी राखणं गरजेचं आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रोजचा स्वयंपाक पटकन, कमी तेलात आणि आरोग्यदायी हवा असतो.(Best kadai for daily cooking) पण सर्वात मोठा प्रश्न असतो तो कुठली कढई वापरायची? (Iron vs nonstick kadai)
बाजारात सध्या नॉनस्टिक, स्टील, अॅल्युमिनियम अशा अनेक प्रकारच्या कढई उपलब्ध आहेत. पण आरोग्याच्या दृष्टीने काही भांडी वापरणं टाळावं लागतं.(Cast iron kadai benefits) आपण भाज्या शिजवत असाल, फोडणी देत असाल किंवा तळत असाल, योग्य कढई केवळ जेवणच स्वादिष्ट बनवत नाही तर आरोग्य आणि वेळेची बचत देखील करते. पण रोजच्या स्वयंपाकासासाठी कोणती कढई चांगली आहे जाणून घेऊया.
जोर न लावता पोट होईल साफ, गव्हाच्या पिठात कालवा ४ गोष्टी, रोज सकाळचा त्रास होईल बंद
स्टेनलेस स्टीलची कढई ही जास्त काळ टिकणारी आहे. यात आपण रोजच्या भाज्या, डाळ, तडका आणि पास्ता बनवू शकतो. यामध्ये कोणते रासायनिक कोटिंग नसते. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचणार नाही. लोखंडी तव्यावर स्वयंपाक केल्याने अन्नात नैसर्गिक लोह तयार होते. भाज्या, पराठे आणि फ्राईजसारखे पदार्थ यावर बनवता येतात. हा तवा वापरल्यानंतर नॉन-स्टिक पॅनसारखा काम करतो.
आपल्याला कमी तेलात भाज्या शिजवायच्या असतील तर अॅनोडाइज्ड कढई वापरता येईल. यामध्ये भाज्या कमी तेलात बनवता येतात. तसेच हे आरोग्यासाठी नॉन स्टिकपेक्षा जास्त सुरक्षित असते. साफ करण्यासाठी देखील हे सगळ्यात चांगले आहे.
ट्राय-प्लाय स्टेनलेस स्टील कढई ही गॅस किंवा इंडक्शन दोघांसाठी वापरता येते. बाहेरुन स्टील, आतून अॅल्युमिनियमपासून बनलेली आहे. यामध्ये अन्न लवकर शिजते. जर आपल्याला रोजचा स्वयंपाक हेल्दी, चविष्ट आणि सुरक्षित करायचा असेल तर नॉनस्टिकच्या भांड्यांना विसरुन लोहाची कढई वापरु शकता.
