Join us
Daily Top 2Weekly Top 5

ढाराढुर झोपण्याच्या यादीत 'हा' देश आहे सगळ्यात पुढे- बघा भारताचा नंबर कितवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2026 18:58 IST

Social Viral: कोणत्या देशातले लोक सगळ्यात जास्त झोपतात बरं.. बघा रंजक माहिती...

झोप ही खूप गरजेची आहे. आपलं शरीर, मन दिवसभर काम करून थकलेलं असतं. आपला मेंदूही कधी ना कधी थकताेच. त्यामुळे आपल्या शरीराला जशी विश्रांतीची गरज असते, तशीच आपल्या मेंदूलाही असतेच. मेंदू आणि शरीर या दोघांना विश्रांती हवी असेल तर झोप खूप गरजेची आहे. आता आपल्या भोवती आपण काही असे लोक पाहातो की जे अंथरुणावर पडताच गाढ झोपून जातात, तर काही लोक असेही असतात ज्यांना मध्यरात्रीपर्यंत झोपच येत नाही... झोपेचं गणिक प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तसंच ते देशानुसार बदलतही जातं. म्हणूनच World Population Review यांनी याविषयीचा नुकताच एक अभ्यास केला असून यामध्ये अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत...

 

'या' देशातले लोक सर्वाधिक वेळ झोपतात...

World Population Review यांनी केलेल्या अभ्यासानुसार रोमानिया या देशातील लोक झोपेच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहेत. या देशातले लोक सगळ्यात जास्त वेळ झोपत असल्याने सर्वाधिक वेळ झोपण्याच्या यादीत रोमानिया क्रमांक एक वर आहे.

ओठांभोवतीची त्वचा, कपाळ काळसर दिसतं? पिगमेंटेशनही वाढलं, घ्या उपाय- १५ दिवसांत त्वचा होईल उजळ, नितळ

सर्व्हेनुसार असं सांगण्यात आलं आहे की रोमानियामधले लोक साधारणपणे सरासरी ९ तास झोपतात. शिवाय त्यांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळाही अगदी ठरलेल्या असतात. त्यात सहसा बदल होत नाही. यानंतर न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक येतो. या देशातल्या लोकांचा सरासरी झोपण्याचा वेळ साधारणपणे साडेसात ते आठ तासांचा आहे. 

 

आपण किती तास झोपतो हे जसं महत्त्वाचं असतं तशीच आपली झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. रोमानिया, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमधील लोकांची झोपेची गुणवत्ताही चांगली आहे, असं या अहवालात समोर आलं आहे. या यादीत भारत मात्र पहिल्या १० देशांच्या यादीतही नाही.

भरपूर प्रोटीन देणारा सगळ्यात स्वस्त पदार्थ- पाहा रेसिपीही चविष्ट! महागड्या प्रोटीन पावडर विसरा

भारतातल्या लोकांचा सरासरी झोपेचा वेळ हा ७ तासांचा असून त्यात शांत झोपेचे प्रमाणही कमी आहे. सध्या हा अनुभव थोड्याफार फरकाने आपणही घेतच आहोत. मोबाईलमुळे तर झोप पुर्णपणे बिघडून गेलेली आहे. पण त्याचे आरोग्यावर परिणाम होऊ नयेत म्हणून यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Romania tops sleep chart; where does India rank?

Web Summary : Romanians sleep the most, averaging 9 hours. New Zealand and Australia follow. Indians average 7 hours, with less restful sleep. Mobile use impacts sleep quality.
टॅग्स :सोशल व्हायरलआरोग्यहेल्थ टिप्स