Height Facts : उंची व्यक्तीचं इम्प्रेशन वाढवण्यास आणि प्रभाव पाडण्यास खूप महत्वाची ठरते. पण हल्ली लहान मुलांची उंची कमी वाढायला लागली आहे. उंची न वाढण्याची कारणं वेगवेगळी आहेत. अनेक गोष्टींमध्ये उंची फारच महत्वाची मानली जाते. पण कधी प्रश्न पडलाय का की, जगात सर्वात उंच लोक कुठे असतात? तर याचं उत्तर आहे नेदरलँड्स. येथे लोकांची सरासरी उंची 6 फूटांपेक्षा जास्त आहे. याशिवाय मॉन्टेनेग्रो, एस्टोनिया आणि आइसलँड हे देशही उंचीच्या बाबतीत आघाडीवर आहेत.
मात्र भारत या यादीत बराच मागे आहे. भारतात पुरुषांची सरासरी उंची सुमारे ५ फूट ४ इंच, तर महिलांची साधारण ५ फूट आहे. याहूनही चिंतेची बाब म्हणजे देशातील प्रत्येक तिसरे मूल स्टंटेड आहे, म्हणजेच त्याची वाढ वयानुसार होत नाही. हे केवळ आकडे नाहीत, तर भारताचं वास्तव चित्र आहे.
भारतात मुलांची उंची का कमी होत आहे?
भारतामध्ये मुलांची उंची का घटत आहे, याची कारणे स्पष्ट आहेत. लहानपणी प्रोटीनची कमतरता, आयर्न, झिंकसारख्या पोषकद्रव्यांचा अभाव, मैदानी खेळांपासून वाढत चाललेले अंतर आणि वाढता स्क्रीन टाइम ही प्रमुख कारणे आहेत. ८ ते १८ वर्षे हा वाढीसाठी सुवर्णकाळ असतो, कारण याच वयात ग्रोथ प्लेट्स उघड्या असतात. या काळात योग्य आहार, पुरेशी ऊन-हवा, नीट झोप आणि नियमित व्यायाम न मिळाल्यास उंची वाढवण्याची संधी पुन्हा मिळत नाही.
उंची वाढवण्यात योगाची भूमिका
उंची वाढवण्यासाठी योगा खूप उपयुक्त ठरू शकतो. योग म्हणजे शरीरासाठी एक संपूर्ण ग्रोथ पॅकेज आहे. सूर्यनमस्कार करताना पुढे वाकल्यावर हॅमस्ट्रिंग स्नायू स्ट्रेच होतात, मागे वाकल्यावर कणा लवचिक होतो, आणि शरीर वर उचलले की ग्रोथ हार्मोन सक्रिय होते. संशोधनानुसार ६०–८०% उंची जेनेटिक असते, तर २०–४०% उंची आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. म्हणजेच उंची अर्धी नशिबाने आणि उरलेली अर्धी आपल्या मेहनतीने ठरते.
कशी वाढवाल मुलांची उंची?
डॉक्टर सांगतात की, मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांना खेळू द्या. लहान मुलांनी बाहेर मैदानात जाऊन खेळणं त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप गरजेचं असतं. नियमितपणे फिजिकल अॅक्टिविटी केल्यास त्यांची उंची तर वाढेलच, सोबतच त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. तसेच यानं त्यांची हाडं मजबूत होतात आणि त्यांचा मूडही चांगला राहतो. त्यामुळे पालकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, लहान मुलांनी दिवसभर घरात टीव्ही किंवा मोबाइलमध्ये वेळ घालवू नये. बाहेर इतरांसोबत वेगवेगळे खेळ खेळावे.
इतरही काही टिप्स
डॉक्टरांनी पोस्टमध्ये खाण्या-पिण्याच्या काही गोष्टींबाबतही सांगितलं आहे. डॉक्टर म्हणाले की, लहान मुलांच्या मेंदुसाठी सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे कॅंडीज आणि सगळ्यात चांगलं फूड म्हणजे ब्लूबेरीज.
फ्रेंच फ्राइज सतत खाल्ल्यास लहान मुलांच्या हृदयाचं आरोग्य बिघडतं. तर सगळ्यात चांगलं फूड ब्राउन राइस आहे.
उंचीसाठी सगळ्यात वाईट फूड म्हणजे नूडल्स आणि सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे मुलांना बाहेर खेळावं.
लहान मुलांच्या फुप्फुसांसाठी सगळ्यात घालत फूड म्हणजे पॅकेटमधील फूड आणि सगळ्यात चांगलं फळ सफरचंद आहे.
कोल्ड ड्रिंकमुळे लहान मुलांची हाडं कमजोर होतात. तर दह्यानं हाडं मजबूत होतात.
Web Summary : Netherlands boasts the tallest average height. India lags, facing child stunting issues due to poor nutrition, less outdoor play, and screen time. Yoga, proper diet, and outdoor activities are crucial for boosting children's height. Avoid junk food; choose blueberries and apples.
Web Summary : नीदरलैंड में सबसे अधिक औसत ऊंचाई है। भारत पोषण की कमी और कम बाहरी खेल के कारण बच्चों के विकास में पिछड़ रहा है। योग, उचित आहार और बाहरी गतिविधियाँ बच्चों की ऊंचाई बढ़ाने के लिए महत्वपूर्ण हैं। जंक फूड से बचें, ब्लूबेरी और सेब चुनें।