Lokmat Sakhi >Social Viral > तुम्ही जे पनीर म्हणून खाता ते पनीर नाहीच! अँनालॉग पनीर खाताय, हा काय भलताच प्रकार

तुम्ही जे पनीर म्हणून खाता ते पनीर नाहीच! अँनालॉग पनीर खाताय, हा काय भलताच प्रकार

What you eat as paneer is not paneer see what is happening in market : पनीरच्या नावाखाली फॅट्स खाऊ घालतात विक्रेते. पाहा काय गडबड आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 17:56 IST2025-05-01T13:44:49+5:302025-05-01T17:56:38+5:30

What you eat as paneer is not paneer see what is happening in market : पनीरच्या नावाखाली फॅट्स खाऊ घालतात विक्रेते. पाहा काय गडबड आहे.

What you eat as paneer is not paneer see what is happening in market | तुम्ही जे पनीर म्हणून खाता ते पनीर नाहीच! अँनालॉग पनीर खाताय, हा काय भलताच प्रकार

तुम्ही जे पनीर म्हणून खाता ते पनीर नाहीच! अँनालॉग पनीर खाताय, हा काय भलताच प्रकार

शरीराला गरज असणाऱ्या गुणधर्मांचा समावेश आहारात व्हावा यासाठी आपण अनेक पदार्थ आहारामध्ये घेतो. (What you eat as paneer is not paneer see what is happening in market  )भाज्या, कडधान्ये तसेच विविध फळे आदी पदार्थ आहारात असतात. त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश होतो. दुधाचे पदार्थ फार पौष्टिक असतात. पोषण मिळवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, पनीर हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे डाएटमध्ये पनीर असणे फायद्याचेच ठरते. 

पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन तर असतातच त्याच बरोबर शरीराला गरजेचे असलेले अमिनो अॅसिड असते. कॅल्शियम व फॉस्फरस असते. पनीर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असते. जीवनसत्त्व 'ए' ,'डी' ,'इ' तसेच जीवनसत्त्व 'बी१२' पनीरमध्ये असते.(What you eat as paneer is not paneer see what is happening in market  ) त्यामुळे पनीर खाणे नक्कीच चांगले आहे. पण आजकाल भेसळयुक्त पनीरबद्दल अनेक तक्रारी नोंदवल्या जात आहेत. त्यामुळे आपण खातो ते पनीर चांगले आहे का? असा प्रश्न पडतो.

पनीरच्या किंमती वेगवेगळ्या असतात. प्रत्येक कंपनी वेगळ्या भावाने पनीर विकते. असे का? महाग विकणार्‍या कंपनी लुटतात असा अंदाज आपसूकच तुम्ही लावत असाल. मात्र चित्र अगदी उलटे आहे. दुधाचे चांगले पनीर हे महाग विकले जाते. अगदी स्वस्त दरात मिळणारे पनीर जे हॉटेलमध्ये वापरले जाते ते खरे पनीर नाही. त्यामध्ये दूध नसतेच. त्याला अॅनलॉग पनीर असे म्हणतात. 

 

अॅनलॉग पनीर म्हणजे असे पनीर जे खऱ्या दुधाचे नसते. त्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल वापरले जाते. पाम ऑइलचा वापर केला जातो. सोया प्रोटीन, मटार प्रोटीन आणि स्टार्चचा वापर या पनीरमध्ये केला जातो. त्यात चवीसाठी अॅडिटीव्हज असतात. विकत मिळणारे पनीरचे पदार्थ आवडीने खात असाल तर मग तुम्ही कदाचित कृत्रिम पनीर चांगले समजून खात आहात. हे पनीर स्वस्त असते त्यामुळे त्याला मागणी आहे. आरोग्यासाठी असे पनीर चांगले नाही. प्रत्येक नागरिकाला दुधाचे पनीर व अॅनलॉग पनीर मधील फरक जाणून घ्यायचा हक्क आहे, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव नीधी खरेंचे मत आहे. ग्राहक मंत्रालयाने हॉटेलच्या मेन्यूमध्ये पनीरच्या पुढे दुधाचे किंवा अॅनलॉग असे लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

पनीर खाताना सावध राहा. असे कृत्रिम पनीर शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये पनीर घ्याल आणि वजन दुप्पट वेगाने वाढेल कारण हे कृत्रिम पनीर फॅट्सने भरलेले असते.

Web Title: What you eat as paneer is not paneer see what is happening in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.