Lokmat Sakhi >Social Viral > काही औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? ती असेल तर आपण नक्की काय समजायचं..

काही औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? ती असेल तर आपण नक्की काय समजायचं..

Health Interesting Facts : काही पॅकेट्सवर लाल रंगाची रेष असते. पण त्याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:01 IST2025-08-25T18:55:29+5:302025-08-25T20:01:30+5:30

Health Interesting Facts : काही पॅकेट्सवर लाल रंगाची रेष असते. पण त्याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण पाहणार आहोत.

What is the meaning of red line seen on some medicine strips? | काही औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? ती असेल तर आपण नक्की काय समजायचं..

काही औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? ती असेल तर आपण नक्की काय समजायचं..

Health Interesting Facts : आजारी पडल्यावर सामान्यपणे सगळेच लोक डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर आपली तपासणी करून आवश्यक ती औषधं देतात. मग आपण मेडिकल स्टोरमध्ये जाऊन औषधं घेतो. साधारणपणे यातील काही औषधांची म्हणजे गोळ्यांची पाकिटं आपल्या ओळखीची असतात. तर काही ओळखीची नसतात. मुळात लोक या पॅकेट्सकडे नीट बघतात का? किंवा त्यावरील माहिती वाचतात का? हा प्रश्न आहे. कारण अनेक पॅकेट्सवर आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती दिलेली असते किंवा काही सूचना दिलेल्या असतात. पण पाहिलं असेल की, काही पॅकेट्सवर लाल रंगाची रेष असते. पण त्याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण पाहणार आहोत.

लाल रंगाच्या रेषेचा अर्थ काय?

लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची क्वचितच माहिती असते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेगवेगळी औषधं मेडिकल स्टोरमधून विकत घेतात आणि नंतर त्यांना गंभीर समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आता महत्वाचा मुद्दा समजून घेऊया.

गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत, ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.

लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.

NRx चा अर्थ?

तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात, ज्यांना औषधं देण्याचं लायसन्स असतं.

काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.

Web Title: What is the meaning of red line seen on some medicine strips?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.