Join us
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या स्ट्रिपवर का असतात लाल - निळ्या रंगाच्या रेषा? नीट समजून घेतलं तर फायदाच होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:58 IST

Health Tips : औषधांच्या स्ट्रिपवरील लाल - निळी रेष अनेकांना वाटते की फक्त डिझाइनचा भाग आहे, पण प्रत्यक्षात या रेषांचा महत्त्वाचा अर्थ असतो. सर्व औषधांवर या रेषा नसतात, त्यामुळे त्यांचा अर्थ जाणून घेणं गरजेचे आहे.

Health Tips : हल्ली औषधांचा आणि आपला संबंध रोजच येतो. घरात वेगवेगळ्या प्रकारची औषधं ठेवलेली असतात. पण आपण कधी औषधांच्या स्ट्रिपवर म्हणजे पाकिटावर लाल किंवा निळ्या रंगाची रेष पाहिली आहे का? ही रेष अनेकांना वाटते की फक्त डिझाइनचा भाग आहे, पण प्रत्यक्षात या रेषांचा महत्त्वाचा अर्थ असतो. सर्व औषधांवर या रेषा नसतात, त्यामुळे त्यांचा अर्थ जाणून घेणं गरजेचे आहे.

लाल रेषेचा अर्थ काय?

औषधांच्या पाकिटावर साधी लाल रेषा असल्यास ती औषधे फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळतात. म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ही औषधं घेऊ नयेत. ही रेषा ग्राहकांसोबतच फार्मासिस्टसाठीही इशारा असते की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषधं विकू नयेत. बहुतेक अँटिबायोटिक्स, पेनकिलर, मानसिक आजारांवरील व हार्मोनशी संबंधित औषधांवर लाल रेषा असते. चुकीच्या पद्धतीने अँटिबायोटिक्स घेतल्यास Antimicrobial Resistance निर्माण होऊन औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो.

निळ्या रेषेचा अर्थ काय?

निळी रेषा असलेली औषधं शेड्यूल G अंतर्गत येतात. ही औषधं घेताना वैद्यकीय देखरेख व दीर्घकाळ मॉनिटरिंग आवश्यक असते.

इतर रंगांच्या रेषांचे अर्थ

हिरवी रेषा: ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधं – सामान्य वापरासाठी तुलनेने सुरक्षित

काळी रेषा: गंभीर साइड इफेक्ट्सचा जास्त धोका दर्शवणारा इशारा

औषधांच्या स्ट्रिपवर असलेल्या रंगीत रेषा केवळ डिझाइन नसून आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. त्यामुळे औषध खरेदी करण्यापूर्वी या रेषांचा अर्थ समजून घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Decoding Medicine Strip Colors: Red, Blue Lines Explained for Your Health

Web Summary : Medicine strip colors aren't just design. Red indicates prescription-only drugs, blue requires medical supervision. Green signifies over-the-counter availability, black warns of severe side effects. Understand these lines before buying; consult a doctor.
टॅग्स :सोशल व्हायरलआरोग्य