चपात्यांवर (Chapati) थोडं तूप लावल्यास त्याचा सुगंध संपूर्ण जेवणाला स्वादीष्ट बनवतो आणि तूप लावलेले पदार्थ खाल्ल्यानंतर पूर्ण थकवा काही क्षणातच नाहीसा होतो. भारतीय स्वंयपाकघरांमध्ये तूप फक्त चव वाढवण्यासाठीच नाही तर परंपरा आणि आरोग्य आणि संस्कृती जपण्याची एक ओळख आहे (What Is Ghee Called In English). तूप खाल्ल्यानं त्वचा, केस चांगले राहण्यास मदत होते. याला क्लॅरिफाई़ बटर असंही म्हणतात. (If Butter Is Called Butter Then What Is Ghee Called In English)
रात्रीच्या जेवणात तुपाचा समावेश केल्यास त्याचा सुगंध वाढतो आणि दिवसभराचा थकवासुद्धा दूर होतो. भारतात तूप फक्त एक खाद्यपदार्थ नसून आपली संस्कृती, परंपरा आणि आरोग्याचा एक भाग आहे. तुपाला इंग्रजीत काय म्हणतात ते समजून घ्या.
तुपाला इंग्रजीत क्लॅरिफाईड बटर म्हणतात. लोणी मंद आचेवर गरम करून पाणी आणि दूधाचा अंश काढून तयार केले जाते. भारतीय संदर्भात याला तूप असं म्हणतात. हा शब्द संस्कृतातील घृत या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ आहे शुद्ध तूप.
तुपाचे फायदे
तुपात ब्युटिरीक एसिड असते ते पचनक्रिया मजबूत बनवते. त्वचा आणि केसांसाठी योग्य ठरते. तुपात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहते आणि केस मजबूत होतात. तुपात ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात जे हृदयाच्या कार्यासाठी गुणकारी ठरतात. तुपात कोलिन असते शरीराची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते.
तुपाचा वापर उच्च तापमानावर ठेवलेलं अन्न शिजवण्यासाठी केला जातो. कारण याचा स्मोक पॉईंट उच्च असतो. एक चमचा तुपाचे सेवन रोज केल्यास विशेषत: सकाळी रिकाम्यापोटी किंवा उपाशी पोटी केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. तुपाचा वापर पूजेसाठी, दिवा लावण्यासाठीही केला जातो. हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.
तूप आतड्यांचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्टता, मूळव्याध यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तूप त्वचेला खोलवर मॉईश्चराईज करते आणि त्वचा हायड्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहते. तूप खाल्ले की रूप येतं असं म्हटलं जातं कारण तूप चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासही मदत करते.