Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?

Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?

Carbide Gun : 'कार्बाइड गन' किंवा 'एग्री-कॅनन' वापरामुळे निष्पाप मुलांसह तब्बल ३०० लोकांच्या डोळ्यांना किरकोळ ते गंभीर दुखापत झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:07 IST2025-10-24T13:04:52+5:302025-10-24T13:07:00+5:30

Carbide Gun : 'कार्बाइड गन' किंवा 'एग्री-कॅनन' वापरामुळे निष्पाप मुलांसह तब्बल ३०० लोकांच्या डोळ्यांना किरकोळ ते गंभीर दुखापत झाली आहे.

what is carbide gun Diwali injury 300 people eyes damaged | Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?

Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?

मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. 'कार्बाइड गन' किंवा 'एग्री-कॅनन' वापरामुळे निष्पाप मुलांसह तब्बल ३०० लोकांच्या डोळ्यांना किरकोळ ते गंभीर दुखापत झाली आहे. शेतकऱ्यांनी माकडं आणि पक्ष्यांना घाबरवण्यासाठी बनवलेले हे उपकरण दिवाळीच्या उत्सवादरम्यान जीवघेणं ठरलं. यापैकी ३० लोकांची प्रकृती गंभीर आहेत. कार्बाइड गनमुळे शेकडो लोकांनी आपली दृष्टी गमावली आहे.

कार्बाइड गन ही ऑनलाईन "मंकी रिपेलर गन" या नावाने विकली जात आहे. मात्र सध्या दिवाळीत फटाके उडवण्यासाठी तिचा वापर करण्याचा ट्रेंड पाहायला मिळाला. या गनमध्ये कॅल्शियम कार्बाइड, माचिसच्या काड्यांची पावडर आणि गनपाऊडरचं मिश्रण असतं. जेव्हा पाणी टाकलं जातं तेव्हा हे मिश्रण एसिटिलीन गॅस बनतं, जे पेटवल्यावर एक मोठा स्फोट होतो. या स्फोटातून तीव्र उष्णता, विषारी वायू आणि कण बाहेर पडतात, जे डोळ्यांसाठी घातक ठरू शकतात. बाजारात या कार्बाइड १५० ते २०० रुपयांना विकल्या जातात, परंतु ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची किंमत ५०० ते २००० रुपयांदरम्यान आहे.

भोपाळमधील हमीदिया रुग्णालयात सात मुलांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले, तर ग्वाल्हेर आणि विदिशामध्येही अनेक प्रकरणे नोंदवण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाचे प्रभारी राजेंद्र शुक्ला यांनी तातडीने आढावा बैठक बोलावली आणि बाधित मुलांसाठी एक विशेष वैद्यकीय पथक स्थापन केले. "आम्ही या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत" अशी माहिती दिली.

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी

डोळ्यांना गंभीर दुखापत

एम्स-भोपाळ येथील नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. भावना शर्मा यांच्या मते, कार्बाइड गनमुळे होणारी 'एल्कलाइन इंजरी' डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. एसिडच्या तुलनेत, 'एल्कलाइन इंजरी'चा खोलवर परिणाम होतो आणि त्यामुळे कायमचं नुकसान होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, दृष्टी पूर्णपणे जाते. भोपाळमध्ये एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांना त्रास झाला, तर ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये ५० प्रकरणं नोंदवली गेली.

१५० रुग्णांवर उपचार

टीओआयच्या रिपोर्टनुसार, भोपाळच्या एम्समध्ये १३ आणि गांधी मेडिकल कॉलेजमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका गंभीर रुग्णाला दिल्लीच्या एम्समध्ये रेफर करण्यात आलं. भोपाळमध्ये पंधरा जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर उर्वरितांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. विदिशा आणि होशंगाबादमधील रुग्णांनाही भोपाळला रेफर करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात सुमारे १५० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

बंदी असूनही विक्री

दोन आठवड्यांपूर्वी प्रशासनाने कार्बाइड गनच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली होती, परंतु त्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे विकल्या जात होत्या. पीव्हीसी किंवा धातूच्या पाईप्सपासून बनवलेल्या या गन DIY किट किंवा वापरण्यास तयार म्हणून विकल्या जात होत्या. काही विक्रेत्यांनी इग्निशन मॅकेनिझ्म आणि प्रोटेक्टिव ग्लव्स देखील दिले होते, ज्यामुळे त्या सुरक्षित वाटत होत्या.मात्र या गम जीवघेण्या ठरल्या.

Web Title : दिवाली पर कार्बाइड बंदूक का कहर: सैकड़ों घायल, कई ने खोई रोशनी

Web Summary : मध्य प्रदेश में दिवाली समारोह दुखद घटना में बदल गया क्योंकि कार्बाइड बंदूक विस्फोटों में 300 से अधिक लोग घायल हो गए, जिससे आंखों को गंभीर क्षति हुई और दृष्टि चली गई। प्रतिबंध के बावजूद, ये बंदूकें ऑनलाइन बेची जाती हैं, कैल्शियम कार्बाइड मिश्रण से बनी होती हैं, जिससे खतरनाक विस्फोट होते हैं। अधिकारी जांच कर रहे हैं और चिकित्सा सहायता प्रदान कर रहे हैं।

Web Title : Carbide Gun's Diwali Disaster: Hundreds Injured, Many Lose Eyesight

Web Summary : Diwali celebrations turned tragic in Madhya Pradesh as carbide gun explosions injured over 300 people, causing severe eye damage and vision loss. Despite bans, these guns, sold online, are made with calcium carbide mixtures, leading to dangerous blasts. Authorities are investigating and providing medical aid.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.