Lokmat Sakhi >Social Viral > ९ मार्चचे काय? स्मृती इराणींचा थेट सवाल, म्हणाल्या बोला ८ मार्च नंतर काय कराल..

९ मार्चचे काय? स्मृती इराणींचा थेट सवाल, म्हणाल्या बोला ८ मार्च नंतर काय कराल..

What About 9th March? Smriti Irani Asking Very Important Question To All Women : महिलांसाठी रोजच असतो महिला दिन. ऐका स्मृती इराणी काय म्हणतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2025 16:09 IST2025-03-09T14:41:14+5:302025-03-10T16:09:06+5:30

What About 9th March? Smriti Irani Asking Very Important Question To All Women : महिलांसाठी रोजच असतो महिला दिन. ऐका स्मृती इराणी काय म्हणतात.

What About 9th March? Smriti Irani Asking Very Important Question To All Women | ९ मार्चचे काय? स्मृती इराणींचा थेट सवाल, म्हणाल्या बोला ८ मार्च नंतर काय कराल..

९ मार्चचे काय? स्मृती इराणींचा थेट सवाल, म्हणाल्या बोला ८ मार्च नंतर काय कराल..

८ मार्चला जागतिक महिला दिन आपण दर वर्षी साजरा करतो. पण एका दिवसाचं कौतुक असं तर या दिनाचं स्वरूप होत नाही आहे ना? महिला दिनाला सर्वच जण महिलांच्या कतृत्वाचं कौतुक करतात. (What About 9th March? Smriti Irani Asking Very Important Question To All Women)मात्र महिला दिनाच्या व्यतिरिक्त इतर जे दिवस आहेत त्यांचं काय? खरं तर हे इतर दिवस आपणच आपल्यासाठी साजरे करायचे. ते कसे करायचे याची छान माहिती स्मृती इराणी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून दिली आहे. जाणून घ्या त्या काय म्हणत आहेत.(What About 9th March? Smriti Irani Asking Very Important Question To All Women)

स्मृती इराणी म्हणतात, "८मार्चनंतरही रोज स्वत:चं महत्व महिलांनी स्मरणात ठेवायला हवे. पुढील ८ मार्चपर्यंत जैसे थे जणण्यात काही अर्थ नाही. (What About 9th March? Smriti Irani Asking Very Important Question To All Women)तीन गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक महिलेने लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे." 

१. महिलांच्या स्वभावातच त्यागाची भावना असते. आपण आपल्या लहान-सहान आवडी, छंद सोडून देतो. इतरांच्या आनंदासाठी स्वत:चा आनंद त्यागण्याआधी महिला विचारही करत नाहीत. अगदी आजारी असल्या तरीही काम काही थांबवत नाहीत. डॉक्टरांकडे जात नाहीत कारण खर्च वाचतो. वेळ वाचतो. पण असे वागणे चुकीचे आहे. स्वत:ची काळजी घेणेही गरजेचे असते. स्वतःचाही आनंद जपला पाहिजे. आणि ते करताना संकोच वाटण्याची काहीच गरज नाही. 

२. अनेक महिला दिवसातून वेळ काढून आरोग्याकडे लक्ष देतात. धावायला जातात. चालायला जातात. व्यायाम करतात. आरामही करतात. पण तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या सज्ञान करता का? अनेक महिला नाही करत. तुमच्या आजूबाजूला अर्थव्यवस्था कशी चालू आहे. या बद्दल स्वतःला सज्ञान ठेवणे गरजेचे असते. आपल्याला त्या माहितीची गरज नसते, असं आपल्याला वाटतं. ट्रेडींग, स्टॉक मार्केट यामध्ये तुम्हाला काहीही छंद नसला, तरीही त्याबद्दल सामान्य माहिती असणं महत्त्वाचं आहे. महिलांना आर्थिकज्ञानात भर घालून घेण्याची गरज आहे. इतरही गोष्टी आहेत जसे की इतिहास, राजकारण, वाङमय यांबद्दलही माहिती घेत राहा.

३. तुमच्या आवडीची एखादी कृती रोज करा. ज्यामुळे बुद्धीला चालना मिळेल. मग बुद्धिबळ असेल किंवा कोडी सोडवणे असेल. वाचन करणे तर फारच फायदेशीर आहे. तुम्हाला जे करायला आवडेल ते करा. शारीरिक कसरती आपण करतो. पण बुद्धीलाही चालना मिळणे गरजेचे असते. ती चालना अशा वैचारिक क्रिया केल्याने मिळते. भाषा शिकू शकता. एखादा बौद्धिक खेळ तुम्ही खेळू शकता. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. फक्त त्या केल्या पाहिजेत. 


Web Title: What About 9th March? Smriti Irani Asking Very Important Question To All Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.