Join us

पाणीपुरी नेहमीच खाता, ही गारेगार बर्फपुरी पाहिली का? पाहा भलताच अचाट पुरीप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 13:20 IST

Ice Panipuri: पाणीपुरीसोबत सतत जे काही नवनवे प्रयोग होत असतात, त्याच मालिकेतला हा आणखी एक प्रयोग.. आवडला असेल तर घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता.(experiments with panipuri)

ठळक मुद्देआणखी एक वेगळाच प्रयोग पाणीपुरीसोबत करण्यात आला आहे. आईस पाणीपुरी...

कोणताही मौसम असला तरी पाणीपुरी (panipuri) खाण्याचा मोह होतोच. अगदी रिमझिम पावसात रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाणं टाळा, हे कितीही माहिती असलं तरी खवय्यांना पाणीपुरीचा आस्वाद घेतल्याशिवाय काही करमत नाही. चिंच, पुदिना, बटाटा आणि वेगवेगळे मसाले यांच्या मिश्रणातून तयार होणारी पाणीपुरी म्हणजे आहाहा..... सगळ्यांना आवडणाऱ्या या पाणीपुरीसोबत मात्र सतत काही ना काही प्रयोग (Weird Food Combination with panipuri) केले जातात. कधी त्यात मॅगी टाकली जाते तर कधी कोल्ड्रिंक ओतलेली पाणीपुरी खायला दिली जाते. असाच आणखी एक वेगळाच प्रयोग पाणीपुरीसोबत करण्यात आला आहे. (panipuri with ice)

 

इन्स्टाग्रामच्याfood_addiction9 या पेजवर या आईस पाणीपुरीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त ट्रेंडिंग झाला असून त्याला सव्वा लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओला देण्यात आलेल्या टॅगवरून ही पाणीपुरी जयपूरला मिळत असावी असे वाटते. पाणीपुरी बनविण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. काही जणांना हा प्रयोग आवडलाही. पण खऱ्या पाणीपुरी खवय्याला मात्र पाणीपुरीसोबत केलेला हा प्रकार मुळीच आवडलेला नसावा. खाणार का समोसा? मग घ्या चॅलेंज, खाऊन दाखवा ४ किलोचा एकच बाहुबली समोसा! पहा व्हायरल व्हिडिओ

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की त्या विक्रेत्याने सुरुवातील पाणीपुरीमध्ये बर्फाचे तुकडे टाकले. त्यानंतर त्यावर टोमॅटो सॉस टाकला. चिंचेची चटणी आणि एक हिरवी चटणी टाकली. ती बहुतेक पुदिना चटणी असावी. त्यानंतर वरतून थोडा चाट मसाला आणि थोडी शेव टाकली. बस्स एवढंच.. आणि बर्फपुरी झाली तयार. हत्तीच्या पिल्लाला इतकी आवडली एक मॉडेल! लाडात येत छोट्या हत्तीने पाहा काय केले, व्हायरल व्हिडिओ बघा रेसिपी सोपीच आहे. पण बर्फ आणि सॉसमुळे ती कशी लागत असेल हे सांगता येत नाही. पण तरीही प्रयोग आवडला असेल तर नक्की ट्राय करा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नइन्स्टाग्राम