Hugging Fee : चीन असा देश आहे जेथून नेहमीच अजब अजब घटना समोर येत असतात. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. रिलेशनशिपसंबंधी तर अनेक अचंबित करणाऱ्या घटना इथे घडत असतात. सध्या चीनमधील अशीच एक अजब घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हेनान प्रांतातील एका महिलेनं तरूणासोबत साखरपुडा मोडल्यानंतर एक अजब प्रकार केला, जो वाचून आपलंही डोकं चक्रावेल. साखरपुडा मोडल्यानंतर तरूणीनं तरूणीकडे गळाभेट घेण्याची चक्क फी मागितली आहे.
साखरपुडा मोडला आणि मग...
तरूणी आणि तरूणाचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. त्यावेळी तरुणीने 2 लाख युआन (सुमारे 24,83,000 भारतीय रुपये) भेट म्हणून स्वीकारले. चीनमध्ये ही परंपरा आहे जिथे नवरदेवाचे कुटुंब नवरीला एक ठराविक रक्कम देतात, ज्याला ब्राइड प्राइस किंवा Betrothal Money म्हणतात. नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं, तयारी जोरदार सुरू होती. हॉटेल बुक झाले, आमंत्रणपत्र छापले गेले, पण काही आठवड्यांपूर्वी तरुणीने अचानक लग्न करण्यास नकार दिला.
‘हगिंग फी’ची विचित्र मागणी
तरुणी साखरपुड्यात मिळालेली रक्कम परत करायला तयार होती, पण पूर्ण रक्कम नव्हती. तिने सांगितले की 1,70,500 युआन परत करते, पण 30,000 युआन स्वतःकडे ठेवते, आणि याला ती म्हणाली ‘हगिंग फी’. रिपोर्ट्सनुसार, ही रक्कम फोटोशूट दरम्यान गळाभेट घेण्यासाठी घेतलेली होती. महिला म्हणाली की, हे पैसे काही खर्च आणि हगसाठी ठेवले आहेत.
मुळात दोघांची भेट पारंपरिक मॅचमेकर द्वारे झाली होती. वान नावाच्या मध्यस्थीने सांगितले, “मी हजारो जोडप्यांची लग्न केली आहेत. पण असा प्रकार प्रथमच पाहिला. ही मागणी अत्यंत अनुचित आणि अनैतिक आहे.”
सोशल मीडियावर चर्चा
ही बातमी चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झळकली आणि २.३ कोटींहून अधिक व्यूज मिळाले. काहींनी तरूणीला लालची म्हणाली, तर काहींनी ब्राइड प्राइसची परंपराच अशा वादाचे मूळ असल्याचे सांगितले.
चीनमध्ये लग्नासंबंधी असे वाद फारच कॉमन आहेत. याबाबत तेथील Supreme People’s Court ने स्पष्ट केले आहे की, लग्न न झाल्यास साखरपुड्यावेळी दिलेली रक्कम म्हणजेच Betrothal Money परत करणे आवश्यक आहे.
शेवट काय झाला?
बरीच चर्चा केल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी करार केला. तरुणीने 1,70,500 युआन परत दिले आणि वाद संपवला. मात्र, ‘हगिंग फी’ ही अनोखी मागणी इंटरनेटवर अजून चर्चेचा विषय आहे.