Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या छोट्याशा दिनाने पंतप्रधान मोदींना दिली खास भेट, पाहा व्हायरल व्हिडिओ

इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या छोट्याशा दिनाने पंतप्रधान मोदींना दिली खास भेट, पाहा व्हायरल व्हिडिओ

PM Modi Israel visit: Manipur girl viral video: Visually impaired singer India: दृष्टी नाही पण स्वरांनी जिंकलं जग! इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या दिना सेमटेने मोदींसाठी गायलं, आय लव्ह माय इंडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 16:51 IST2026-02-26T16:50:05+5:302026-02-26T16:51:05+5:30

PM Modi Israel visit: Manipur girl viral video: Visually impaired singer India: दृष्टी नाही पण स्वरांनी जिंकलं जग! इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या दिना सेमटेने मोदींसाठी गायलं, आय लव्ह माय इंडिया...

Visually impaired Manipur girl sings I Love My India for PM Modi Viral video of Manipur-born singer during Modi’s Israel visit Emotional moment during PM Modi Israel tour Indian girl in Israel meets Narendra Modi | इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या छोट्याशा दिनाने पंतप्रधान मोदींना दिली खास भेट, पाहा व्हायरल व्हिडिओ

इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या छोट्याशा दिनाने पंतप्रधान मोदींना दिली खास भेट, पाहा व्हायरल व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्त्राइलच्या दौऱ्यावर आहे. तिथे त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. या दरम्यान एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Manipur girl viral video) हा व्हिडीओ आहे एका दृष्टिहीन मणिपुरी गायिकेचा, जिने आपल्या सुमधुर आवाजाने पंतप्रधानांचेच नाही तर जगभरातील असंख्य भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. (PM Modi Israel visit)

काळाकुट्ट- चिकट बर्नर चमकेल नव्यासारखा! महागडे लिक्विड नको, घरच्या घरी करा ८ रुपयांचा सोपा उपाय-मिनिटांत होईल साफ

जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, तरी आपल्या मातीची ओढ कधीच कमी होत नाही. हीच ओढ नुकतीच इस्रायलमध्ये पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यात अनेक राजकीय चर्चा झाल्या, पण एका गायिकेने या संपूर्ण दौऱ्याला भावनिक स्वरुप दिले. निमित्त होते मणिपूरमध्ये जन्मलेल्या आणि सध्या इस्रायलमध्ये राहणाऱ्या दिना सेमटे यांच्या सादरीकरणाचे. दिना सेमटे या गायिकेच नाव असून, तिने मोदींच्या स्वागत समारंभात सादर केलेले 'आय लव्ह माय इंडिया' हे गाणं सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

दिना सेमटे यांचा जन्म ईशान्य भारतातील मणिपूरच्या निसर्गरम्य ठिकाणी झाला. नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही, पण त्या बदल्यात त्यांच्या गळ्यात अशी जादू दिली की आज ती कित्येक हृदयाचा ठाव घेत आहे.  वयाच्या १२ व्या वर्षी दिना यांना त्यांचे कुटुंब मणिपूर सोडून इस्रायलमध्ये स्थायिक झाले. नवीन देश, नवीन भाषा आणि नवीन संस्कृतीशी जुळवून घेताना दिना यांनी आपले भारतीयत्व आणि संगीताशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. त्यांनी आपल्या गायकीच्या जोरावर इस्रायलमधील भारतीय समुदायात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी इस्त्रायलच्या अधिकृत दौऱ्यावर पोहोचले. तिथे भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. या स्वागत समारंभातील एका विशेष संगीत कार्यक्रमात दिना सेमटेला गाणं सादर करण्याची संधी मिळाली. तिने ये मेरा इंडिया.. आय लव्ह माय इंडिया.. हे गाणं गायला सुरुवात केली. 

ज्यावेळी दिना हे गाणं गात होती, त्यावेळी पंतप्रधान मोदी त्यांच्या समोर बसून या सादरीकरणाचा आनंद घेत होते. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म शेअर केला असून, त्यात दिना हिच्या कलेचे कौतुक केले आहे. 


Web Title : इजराइल में नेत्रहीन मणिपुरी गायिका ने पीएम मोदी को दिया खास तोहफा।

Web Summary : पीएम मोदी की इजराइल यात्रा के दौरान, नेत्रहीन मणिपुरी गायिका दीना सेमटे ने 'आई लव माई इंडिया' गाकर सबका दिल जीत लिया। पीएम मोदी ने इस प्रदर्शन से प्रभावित होकर वीडियो साझा किया और उनकी प्रतिभा की सराहना की।

Web Title : Blind Manipuri singer's heartwarming gift to PM Modi in Israel.

Web Summary : During PM Modi's Israel visit, a visually impaired Manipuri singer, Dina Semte, captivated hearts by singing 'I Love My India'. This performance touched PM Modi, who shared the video, praising her talent and celebrating her unique contribution.