स्वयंपाकघरात काम करताना आपण गॅस शेगडी कितीही चकाक ठेवली, तरी त्यातील गॅस बर्नरकडे आपलं कायम दुर्लक्ष होतं. रोजच्या फोडणीचे उडणारे थेंब, उतू गेलेलं दूध आणि सततच्या आगीमुळे हे बर्नर हळूहळू काळेकुट्ट आणि चिकट होतात.(Gas burner cleaning) अनेकदा तर यातील छिद्र बुजतात, ज्यामुळे गॅसची फ्लेम निळी न येता लाल किंवा पिवळी येते. यामुळे गॅस अधिक वाया जातो आणि भांडी देखील काळी होतात.(Kitchen cleaning hacks) अनेकदा आपण बर्नर साफ करताना खूप घासतो, ज्यामुळे हात दुखतो. महागड्या क्लिनिंग लिक्विड्सवर पैसे खर्च करतो. पण बर्नर काळाकुट्टच राहतो. (Remove grease from stove)
गॅस बर्नर स्वच्छ करणं हे अनेकांसाठी कंटाळवाणं काम असतं. तारेच्या घासणीने कितीही जोर लावला तरी त्यातील काळपटपणा पूर्णपणे जात नाही.अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास पैशांची बचत होईल. ८ रुपयांचा हा उपाय काय आहे ते पाहूया.
गॅस बर्नर क्लिनिंगसाठी लागणारे साहित्य
कोमट पाणी - १ ग्लास
इनो- १ पॅकेट
टूथब्रश
मीठ
लिंबाचा रस
डिश वॉश
गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करा. ते एका मोठ्या भांड्यात ओता. यात लिंबाचा रस घाला आणि बर्नर या पाण्यात बुडवा. या पाण्यामध्ये आता इनो घाला. यानंतर बर्नरला १५ मिनिटे पाण्यात राहू द्या. पाणी थंड झाल्यानंतर बर्नर बाहेर काढून टुथब्रशवर डिश वॉश लावून स्वच्छ घासा. हळूहळू बर्नवर साचलेला कार्बन बाहेर येईल. बर्नरवर हट्टी डाग असतील आणि ते निघत नसतील तर मीठ आणि लिंबाच्या सालीने घासा. यामुळे बर्नर नव्यासारखा चमकेल.
बर्नर घासल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे झाल्याशिवाय गॅसवर लावू नका. ओल्या बर्नरमुळे गॅस लवकर पेटत नाही. तसेच महिन्यातून एकदा ही ८ रुपयांची ट्रिक वापरली, तर आपली शेगडी नेहमीच नव्यासारखी चमकेल.
