Join us

जोडी लय भारी! कोरियन वरासोबत साडीमध्ये झळकली भारतीय नवरी; पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 14:00 IST

Viral Wedding Video : या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या वधू आणि वराची नावं नेहा आणि जोंगसू अशी आहेत.

लग्नाचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत  असतात. लग्न म्हटलं की गमती जमती आल्याच. लग्न समारंभात जोडप्याच्या पेहरावाकडे सगळ्यांचच लक्ष  लागून असतं. सोशल मीडियावर आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral Wedding Video) यात एका भारतीय महिलेचा समावेश आहे जिने कोरियन पुरुषाशी लग्न केले. विशेष म्हणजे ती तिच्या पेहरावामुळे अधिकच चर्चेत आली आहे. (Indian woman wears a saree, all smiles on wedding to Korean husband. Watch)

या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या वधू आणि वराची नावं नेहा आणि जोंगसू अशी  आहेत. ते सध्या दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे आहेत आणि त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर 1.4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत साडी आणि सूट परिधान करून ते लग्नाच्या उत्सवात कसे प्रवेश करतात हे दाखवले आहे.

उन्हामुळे चेहरा निस्तेज, काळपट झालाय? फक्त शिळा भात या पद्धतीनं वापरून मिळवा ग्लोईंग त्वचा

नेहाला लग्नाच्या शुभेच्छा नेटिझन्सनी दिल्या. कोरियन पती निवडल्यानंतरही भारतीय संस्कृतीप्रमाणे साडी नेसल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी या व्हायरल इन्स्टाग्रामच्या कमेंट विभागात नेहाला शुभेच्छा दिल्या आहेत. “माझ्या कोरियन लग्नात साडी नेसली” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.   

टॅग्स :सोशल व्हायरललग्न