Join us

बाबौ! ही तर लेडी 'मिस्टर इंडिया', कॅमेरा समोरच उभ्या उभ्या गायब झाली पोरगी, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:56 IST

Viral Video : एक जपानी मुलगी कॅमेरा समोरून मिस्टर इंडियाप्रमाणे गायब होते.

अनिल कपूरचा चित्रपट मिस्टर इंडिया तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटात अनिल कपूर लाल चश्मा लावतो आणि लोकांच्या नजरेसमोरून गायब होतो. जगभरातील अनेक देशांमधलै शास्त्रज्ञ या दिशेनं संशोधनासाठी प्रयत्नरत आहेत. पण आतापर्यंत यश मिळालेलं नाही.  ट्विटरवर नेटिझन्सनी शेअर केलेला व्हिडिओ सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे.  यात एक जपानी मुलगी कॅमेरा समोरून मिस्टर इंडियाप्रमाणे गायब होते. ही व्हायरल क्लिप पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. काहींनी कमालीची एडिटींग असल्याची प्रतिकिया दिली आहे. (Viral video shows girl disappeared like mr india in front of camera)

१४ सेकंदाची ही क्लिप इंटरनेवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एखाद्या ऑफिसमध्ये शूट केल्याचं दिसून येतंय. काही लोक आपल्या कम्पूटरवर काम करताना दिसत आहेत.  ही मुलगी कॅमेरासमोर एक चमकणारा पेपर घेऊन उभी असल्याचं दिसतंय.  हळूहळू ही तरूणी त्या पेपरनं संपूर्ण शरीर झाकून घेते आणि कॅंमेरासमोर मिस्टर इंडियाप्रमाणे दिसते. 

चांगल्या चेहऱ्याला खराब करतात ५ चुका,  ग्लोईंग स्किनसाठी या घ्या सोप्या स्किन केअर टिप्स

तसे, हा व्हिडिओ पाहून लोक क्षणभर विचारात पडत आहेत. ट्विटरवर @Enezator या हँडलवर व्हिडिओ शेअर करून वापरकर्त्याने लिहिले आहे की, जपानी शास्त्रज्ञांना गायब होण्याचे सूत्र सापडले. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ जवळपास दोन लाख वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया