Join us

Viral video :  युक्रेन बॉम्बस्फोटात दोन्ही पाय गमावूनही हार नाही मानली; लग्नाच्या दिवशी पतीबरोबर नाचताना भावूक झाली नर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:47 IST

Viral video : ल्विव्ह मेडिकल असोसिएशन (LMA) च्या मते, ही घटना घडली तेव्हा जोडपे परिचित रस्त्यावर होते. स्फोटाच्या काही सेकंद आधी ओक्सानाने व्हिक्टरला खुणावले होते. 

युक्रेनमध्ये स्फोटात पाय गमावलेल्या  नर्सचा पतीसोबत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लवीवमधील एका हॉस्पिटलमध्ये शूट करण्यात आला आहे जिथे दोघांनी लग्न केले. 23 वर्षीय ओक्साना बालिंदाना 27 मार्च रोजी पती व्हिक्टरसोबत लुहान्स्क प्रदेशातील लिसिचान्स्क या त्यांच्या गावी चालत असताना तिने भूसुरुंगावर पाऊल ठेवले. भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने ओक्सानाला तिचे दोन्ही पाय पाय आणि डाव्या हाताची चार बोटे गमवावी लागली. ( Ukrainian nurse who lost both legs in blast, dances with her husband at their wedding)

ल्विव्ह मेडिकल असोसिएशन (LMA) च्या मते, ही घटना घडली तेव्हा जोडपे परिचित रस्त्यावर होते. एलएमएने  सांगितले की, स्फोटाच्या काही सेकंद आधी ओक्सानाने व्हिक्टरला खुणावले होते. त्यामुळे व्हिक्टर थोडक्यात बचावला. ओक्सानाला निप्रोमध्ये नेल्यानंतर चार शस्त्रक्रिया झाल्या. 

स्काय न्यूजनुसार, तिची जखम बरी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिचे अवयव प्रोस्थेटिक्ससाठी तयार करण्यास सुरुवात केली. प्रोस्थेटिक्स बसवण्याच्या प्रक्रियेसाठी ती चार दिवसांपूर्वी ल्विव्हमध्ये आली होती. याचवेळी ओक्साना आणि व्हिक्टर या दोघांनी  पश्चिम युक्रेनियन शहरात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

युक्रेनच्या नेत्यांनी शेअर केला व्हिडिओ

दोघांच्या डान्सचा व्हिडिओ हॉस्पिटलमधील एका स्वयंसेवकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. या सुंदर फुटेजमध्ये व्हिक्टर ओक्सानाला मिठी मारताना दिसत आहे. युक्रेनच्या खासदाराने ट्विटरवर देखील हा व्हिडिओ शेअर केला होता, "एक अतिशय खास प्रेमकथा" सांगताना, ल्विव्ह मेडिकल असोसिएशनने सांगितले की "आयुष्य कधीच  थांबू नये" असे ओक्साना आणि व्हिक्टर यांनी अखेर ठरवले, ज्यांना सहा वर्षात लग्नासाठी वेळ मिळाला नव्हता.'' असोसिएशनने जोडप्यासाठी लग्नाची अंगठी आणि ओक्सानासाठी पांढरा ड्रेस खरेदी केला. रुग्णालयातील स्वयंसेवकांनी केक तयार केला होता. शस्त्रक्रिया केंद्राच्या वॉर्डात लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर हे जोडपे जर्मनीला जाण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया