Join us

नाद खुळा! नवरदेवानं पाळीव कुत्र्यासोबत घेतली मंडपात जबरदस्त एंट्री; लोक म्हणाले......

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:35 IST

Groom makes entry with his pet dog : आजकाल हा ट्रेंड जोरात सुरू आहे, ज्याला फॉलो करायला कोणतेही नवीन जोडपे चुकत नाही.

लग्न मुलाचं असो किंवा मुलीचं. प्रत्येकाचीच काही स्वप्न असतात. लग्नात आपली एंट्री खूपच प्रभावशाली असावी असं अनेकांना वाटत असतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. ज्यात नवरा नवरींची धमाकेदार एंट्री दिसून येते. नवऱ्या मुलाच्या या व्हिडिओनं लोकाचं मन जिंकलं आहे.

आजकाल हा ट्रेंड जोरात सुरू आहे, ज्याला फॉलो करायला कोणतेही नवीन जोडपे चुकत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शेरवानी घातलेला वर आपल्या पाळीव कुत्र्यासोबत बाईकवर एन्ट्री घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुमचेही मन जिंकेल. व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे की, लॅब्राडोर जातीचा कुत्राही या क्षणाचा खूप आनंद घेत आहे. लग्नाच्या निमित्ताने डॉगीला वाईन कलरची शेरवानीही घालण्यात आली होती.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ दर्शन नंदू पॉल नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'Like a boss.' काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय. व्हिडिओ अपलोड झाल्यापासून आतापर्यंत 2.5 लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.

मृत्यूनंतरही आई आली लग्नाच्या मांडवात, मुलाला दिला आशीर्वाद, अन्....

एका यूजरने लिहिले आहे की, प्रत्येक कुत्र्याला असे कुटुंब मिळायला हवे. त्याच वेळी, टिप्पणी करताना, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे, इंटरनेटवरील आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ. दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, मी डॉगीला माझ्या लग्नाला Activa वर घेऊन जाईन. एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल