Join us

हे काय भलतंच? चहामध्ये टाकलं चक्क बटर.. 'बटरी चहा' पाहून लोक म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 17:40 IST

Trending video: खाद्य पदार्थांसोबत कोण काय प्रयोग करेल काही सांगता येत नाही... आता हेच पहा ना, या महाशयांनी काय केलं आहे ते...

ठळक मुद्देहा चहा विक्रेता ज्या पद्धतीने चहा तयार करत आहे, ते बघून अनेक जण अवाक झाले आहेत.

वेगवेगळे प्रयोग करून बघणं हा माणसाचा स्वभाव.. पण म्हणून प्रयोगाच्या नावाखाली असं काहीपण करावं का.. आणि ते ही भारतीयांसाठी ज्वलंत विषय असणाऱ्या परमप्रिय चहाच्या बाबतीत? गुळाचा चहा, साखरेचा चहा... केशर चहा, अद्रक चहा.. हे असे चहाचे प्रकार आपण खूप ऐकलेले असतात आणि गरमागरम चहाचा आस्वादही घेतलेला असतो.. पण इथे तर एका चहा विक्रेत्याने कहरच केला आहे (social viral).. त्याने असा काही चहा बनवला की तो पाहूनच अनेक जण चक्रावून गेले आहेत..

 

सोशल मिडियावर (social media) अशा अतरंगी गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. आता एक चहाचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूपच गाजतो आहे. चहा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच हा चहाचा प्रकार नेमका कोणता हे आता प्रत्येक जण जाणून घेण्यास उत्सूक आहे. त्याचं झालं असं की चहाचा हा व्हिडिओ eatthisagra या इन्स्टाग्रामच्या (instagram) पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आग्रा येथील एक चहा विक्रेता दाखविण्यात आला आहे. हा चहा विक्रेता ज्या पद्धतीने चहा तयार करत आहे, ते बघून अनेक जण अवाक झाले आहेत.

 

या चहाविक्रेत्याने चहा करण्यासाठी पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहा पावडर असं सगळं टाकलं.. चहाला उकळी येण्यास सुरूवात झाली आणि त्याने मग चक्क चहामध्ये बटर टाकलं.. थोडं थोडकं नाही तर एका कपासाठी त्यांनी एक ते दोन टेबलस्पून बटर या चहामध्ये टाकलं असावं...

 

नव्या पद्धतीचा हा बटरी चहा नेमका कसा लागतो, ते पिणाऱ्यांनाच ठावूक. पण चहाचा हा व्हिडिओ मात्र सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.. कुणाला हा चहासोबत केलेला प्रयोग अजिबातच आवडलेला नाही तर कुणी कुणी असा चहा पिण्यासाठी चांगलेच उत्सूक असलेले दिसून आले. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नपाककृती