Lokmat Sakhi >Social Viral > पाहा आईची कमाल- घरबसल्या लेकीला घडवली भन्नाट सफर, लेकीला वाटलं आपण डोंगरदऱ्यात-पाहा व्हायरल व्हिडिओ

पाहा आईची कमाल- घरबसल्या लेकीला घडवली भन्नाट सफर, लेकीला वाटलं आपण डोंगरदऱ्यात-पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of Mother And Daughter: माय- लेकीचा एक खूप छान व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 11:45 AM2024-05-07T11:45:17+5:302024-05-07T19:21:33+5:30

Viral Video Of Mother And Daughter: माय- लेकीचा एक खूप छान व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

viral video of mother and daughter playing video in a unique way | पाहा आईची कमाल- घरबसल्या लेकीला घडवली भन्नाट सफर, लेकीला वाटलं आपण डोंगरदऱ्यात-पाहा व्हायरल व्हिडिओ

पाहा आईची कमाल- घरबसल्या लेकीला घडवली भन्नाट सफर, लेकीला वाटलं आपण डोंगरदऱ्यात-पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlights हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असून मुलांसोबत तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. 

उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या बच्चेकंपनी घरीच आहे. त्यामुळे बऱ्याचदा दुपारच्यावेळी खेळायला कोणी नसल्याने बोअर होतंय, कंटाळा येतोय, अशी तक्रार अनेक मुलांची असते. अशावेळी मग पालकांना आणि विशेषत: आईलाच पुढे होऊन मुलांच्या करमणूकीसाठी काहीतरी करावं लागतं. मुलांचं मन रमविण्यासाठी काही काही आई लोकांनी लढविलेली शक्कल खरोखरच कमालीची असते. आता हेच बघा ना सध्या सोशल मिडियावर व्हारल झालेला एक व्हिडिओही तसाच आहे. यामध्ये त्या आईने मुलीचं मन रमविण्यासाठीच असं मजेशीर काम केलं असावं.

 

Figen या सोशल मिडिया हॅण्डलवरून तो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये आई आणि तिची ३ ते ४ वर्षांची लेक अशा दोघी जणी दिसत आहेत. "A mother gives her daughter an unforgettable moment in her life...." असं कॅप्शन त्या व्हिडिओला दिलेलं आहे.

World Asthma Day: लहान मुलांना अस्थमा का होतो? अस्थमाचा खोकला कसा ओळखावा? बघा लक्षणं

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एका बाजुला व्हिडिओगेम लावलेला आहे. त्यावर एक गाडी तुफान वेगाने धावते आहे. डोंगर, नदी असे कित्येक अडथळे पार करत त्या गाडीचा प्रवास मोठ्या वेगात सुरू आहे. आता ती गाडी ती चिमुकली मुलगी चालवते आहे, असा अनुभव तिच्या आईला त्या मुलीला द्यायचा होता. म्हणून तिने खूप छान आयडिया केली.

कोणतंच खत न टाकताही झाडाला येतील भरभरून लिंबू, बघा उपाय- लिंबू वेचूनच दमून जाल...

आईने स्वत:च्या मांडीवर एक खुर्ची उलटी करून ठेवली. त्या खुर्चीवर मग लेकीला बसवलं आणि ती गाडी जशी जशी पुढे पळेल, तशी तशी ती आई ती खुर्ची हलवत होती. खुर्ची, आई आणि लेक तिघी एकाच ठिकाणी होत्या, पण तरीही आई ज्या पद्धतीने खुर्ची हलवत होती, त्यानुसार त्या चिमुकलीला ती स्वत:च गाडी चालवत असल्याचा फिल येत होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर कधी भीती, उत्साह, उत्सूकता, आनंद असे वेगवेगळे भाव दिसून येत होते. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असून मुलांसोबत तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. 

 

Web Title: viral video of mother and daughter playing video in a unique way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.