Join us

हा काय विचित्रपणा! चक्क डोक्यावर शिजवले नूडल्स- बघा व्हायरल व्हिडीओ, कशासाठी केला हा अट्टहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 17:24 IST

Social Viral: डोक्यावर इंस्टंट नूडल्स शिजविण्याचा हा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे...(Barber Cooking Instant Noodles On Man's Hair)

ठळक मुद्देकोणाच्या केसांमध्ये, डोक्यावर शिजवलेल्या नूडल्स कोणी कसं काय खाऊ शकतं, असा प्रश्न तो व्हिडीओ बघणाऱ्याला नक्कीच पडतो.. 

कोण कधी डोक्यात कोणतं खूळ घेईल आणि त्या नादात काय करेल हे काही सांगता येत नाही. त्यांचे हे वेगवेगळे नाद पाहून सामान्य माणूस मात्र पार चक्रावून जातो. सोशल मिडीयामुळे तर जगभरातले असे वेगवेगळे किस्से अगदी सहज आपल्याला बघायला, ऐकायला मिळतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही आजपर्यंत कधी ऐकली नसेल किंवा बघितलीसुद्धा नसेल अशी विचित्र पद्धत वापरून नूडल्स शिजविण्यात आल्या आहेत.(Barber Cooking Instant Noodles On Man's Hair)

 

नूडल्स शिजविण्याच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपी आहेत. पण त्या सगळ्या रेसिपींमध्ये एक गोष्ट मात्र काॅमन असते आणि ती म्हणजे नूडल्स आपण एखाद्या भांड्यामध्ये शिजवतो.

भरपूर प्रोटीन्स देणारा मुगाच्या डाळीचा उत्तपा- वेटलॉससाठीही फायदेशीर, घ्या कुणाल कपूर स्पेशल रेसिपी

पण sagarbhaupandit या इन्स्टाग्राम पेजवरून जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, त्यामध्ये चक्क एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या डोक्यावरच नूडल्स शिजविल्या आहेत. व्हिडिओ पाहून जी माहिती मिळते त्यावरून असं लक्षात येतं की नूडल्स शिजविणारा व्यक्ती हा हेअर ड्रेसर असून तो त्याचं काम करताना नेहमीच असे वेगवेगळे प्रयोग करत असतो.

 

डोक्यावर नूडल्स शिजविण्यासाठी त्याने सगळ्यात आधी त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाच्या माथ्यावरचे केस हेअर स्प्रे किंवा जेल लावून सेट केले आणि ते उभे केले. केसांच्या मधोमध खोलगट भाग तयार केला.

'या' पद्धतीने डोक्याला लावा कॅस्टर ऑईल! टक्कल पडलेल्या भागातही उगवतील केस- होतील दाट, लांब

त्यामध्ये थोडं पाणी, नूडल्स आणि नूडल्स मसाला टाकला. त्यानंतर त्यावर फॉईल पेपर लावून तो भाग पुर्णपणे झाकून घेतला आणि त्यावर फायर ब्लोअर फिरवले. जेव्हा त्याने कव्हर केलेला फॉईल पेपर काढून घेतला तेव्हा आतल्या नूडल्स पुर्णपणे शिजलेल्या होत्या. त्या नूडल्स त्याने चमच्याने उचलल्या आणि चक्क खाऊन टाकल्या. त्याचा हा प्रकार अनेकांना अजिबात आवडलेला नाही. कोणाच्या केसांमध्ये, डोक्यावर शिजवलेल्या नूडल्स कोणी कसं काय खाऊ शकतं, असा प्रश्न तो व्हिडीओ बघणाऱ्याला नक्कीच पडतो.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापाककृती