Join us

Viral Video : डोळ्याची पापणी लवण्याआधी भर व्यासपीठावर बदलल्या पाच साड्या; बघणा-यांचाही विश्वास नाही बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 19:18 IST

Viral Video : भारूडकार ह. भ. प. महादेव महाराज शेडे असं याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

साडी नेसणं काही सोपं काम नाही. ज्या महिला रोज साड्या नेसतात त्यांनाही अजून परफेक्ट साड्या नेसता येत नाहीत. खूप कमी महिलांना  चांगली, चापून चोपून साडी नेसता येते. साडी नेसायला खूप वेळ लागतो. पदर, निऱ्या सर्व व्यवस्थित करण्यात बराच वेळ निघून जातो याची तुम्हाला कल्पना असेलच. सध्या सोशल मीडियावर साधी नेसणाऱ्या महाराजांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण खरंच या महाराजांनी व्यासपीठावर  उभ्या उभ्याच साडी बदलण्याची कमाल केली आहे. (Viral Video)

भारूडकार ह. भ. प. महादेव महाराज शेडे असं याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही पाहू शकता. सुरूवातीला या महाराजांनी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. पदर खोचून ते प्रबोधन करत आहेत. बघता बघता त्यांनी साड्या बदलायला सुरूवात केली. ही कृती इतकी सहज केली की कोणच्याही लक्षात आलं नाही.तुम्हाला दिसून येईल गुलाबी रंगाच्या साडीनंतर त्यांनी पिवळी साडी नेसली आहे. त्यानंतर ते  हुशारीनं पिवळी साडी बाजूला करत काळी वारली पेटींगअसलेल्या साडीवर बोलायला सुरूवात करतात.

एक, एक साडी बाजूला करत असताना त्यांच्या बोलण्यावर किंवा हावभावांवर कोणत्याही परिणाम झालेला दिसत नाही. ते आपल्या खास शैलीत प्रबोधन सुरू ठेतात. काळ्या साडीनंतर पांढरी लाल काठाची साडी नेसलेली तुम्हाला दिसून येईल. सगळ्यात शेवटी हे महाराज पांढरी साडी बाजूला करत आकाशी रंगाच्या लाल फुलांची डिजाईन असलेल्या साडीवर दिसून येतात.  काळं पूर्ण हातांचे ब्लाऊज त्यांनी घातलेलं दिसून येतंय.

मराठी तडका या बेव पोर्टलनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ५०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर ८७ पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. पाच साड्या कशा बदलल्या ते पाहाच असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. 

टॅग्स :लाइफस्टाइलसोशल व्हायरलसोशल मीडिया