Join us

अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:37 IST

सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे.

आजकाल बाजारात भेसळ न करता काहीही मिळणं कठीण होत चाललं आहे. दूध, मसाले, फळं आणि भाज्यांमध्ये भेसळ झाल्याच्या बातम्या आता नॉर्मल झाल्या आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की, केमिकलने बनवलेला प्लास्टिकचा कोबी आता बाजारात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर पायाखालची जमीन सरकेल. या व्हिडिओमुळे भीती आणि संताप दोन्ही निर्माण झाले आहेत.

@mantubabita या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस केमिकल्सचा वापर करू कोबी बनवताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही भाजी इतकी खरी दिसते की कोणालाही मूर्ख बनवता येईल. व्हिडिओमध्ये असलेली व्यक्ती ती भाजी कापून देखील दाखवतो, जी अगदी खऱ्या कोबीसारखी दिसते. व्हिडीओ पाहून लोक विचार करत आहेत की, जर ही घटना खरी असेल तर ते आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकतं.

व्हिडीओ शेअर करणाऱ्या महिलेने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. तिने म्हटलं आहे की, बरेच लोक त्यांच्या दैनंदिन जेवणात कोबीचा वापर करतात, मग पिझ्झा असो, बर्गर असो किंवा चायनीज असो. जर बाजारात बनावट भाज्या विकल्या जात असतील तर ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे. अन्नपदार्थातील भेसळ आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते, म्हणून लोकांनी भाज्या खरेदी करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्सनी दावा केला की, हा कोबी खाण्यासाठी नाही तर शोपीस किंवा डिस्प्ले आयटमसाठी आहे. "हे हॉटेल मेनू बोर्डसाठी बनवलं आहे, खाण्यासाठी नाही" असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने अशा बनावट वस्तू बाजारात येऊ लागल्या तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याबद्दल हजारो लोक अजूनही चिंतेत आहेत असं सांगितलं. हा व्हिडीओ १७ लाखांहून अधिक वेळा लोकांनी पाहिला असून सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beware! Are you eating plastic cabbage? Shocking video goes viral.

Web Summary : A viral video claims plastic cabbage made with chemicals is sold in markets. The video shows a person making cabbage using chemicals, raising health concerns. Many believe it's for display, not consumption, sparking debate.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया