Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबा, माझा ११ वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे! मुलीचं अफेअर कळताच वडिलांनी केलं असं काही की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 15:45 IST

viral video daughter confesses love to father : emotional father daughter viral video : daughter expresses love to father video : viral video daughter confesses love father reaction win users heart viral news : मुलीच अफेअर कळताच, वडिलांच्या गोड प्रतिसादाने मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तर इंटरनेटवर अनेकांची मने जिंकली.

बाप आणि लेकीचं नातं हे जगातील सर्वात हळवं, निखळ आणि शब्दांत न मावणारे नातं आहे... आईचं प्रेम मायेचं आणि जपणूक करणारं असतं, तर वडिलांचं प्रेम अनेकदा शब्दांत न व्यक्त होता कृतीतून दिसून येतं. मुलीच्या आयुष्यात वडील हे पहिले हिरो असतात - तिला सुरक्षिततेची भावना देणारे, आत्मविश्वास शिकवणारे आणि जगाला सामोरं जाण्याची ताकद देणारे. लहानपणी मुलीला चालायला, सायकल शिकायला हात धरून मदत करणारे वडील, पुढे तिच्या प्रत्येक यशात अभिमानानं उभे असतात. ती चुकली तरी ओरडण्याऐवजी समजावून सांगणारे, संकटात पाठीशी उभे राहणारे वडील मुलीसाठी एक भक्कम आधारस्तंभ असतात. मुलीच्या डोळ्यातलं दुःख ते न बोलताही ओळखतात आणि तिच्या हसण्यातच आपलं समाधान मानतात. जगासाठी कठोर दिसणारा बाप मात्र पोटच्या लेकीसाठी खूपच हळवा होतो, तिच्या आनंदासाठी आणि चेहऱ्यावरील एका स्माईलसाठी वाटेल ते करायला तयार असतो(viral video daughter confesses love to father).

नुकतेच मुला - मुलींचं अफेयर फार पूर्वीपासून सुरु असणं किंवा वयात आल्यापासूनच जोडीदार असणं ही सध्या फारच कॉमन गोष्ट झाली आहे. कित्येक मुलं - मुली आपल्या मर्जीनेच जोडीदाराची निवड करतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवण्याचा निर्णय घेतात. पण, अनेकदा आपण पाहिलं असेल की (viral video daughter confesses love father reaction win users heart viral news) अशा प्रेमाला किंवा नात्याला फार क्वचितच घरच्यांकडून मान्यता मिळते. 

जात, धर्म, समाज या सर्वांचा विचार करत अनेकदा कुटुंबाकडून प्रेमविवाहाला मान्यता मिळत नाही. पण अलिकडेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, बाप - लेकीमधील जिव्हाळ्याचे नातेसंबंध असल्याचे दिसते आहे. ज्यात मुलगी आपल्या बाॅयफ्रेंडविषयी वडिलांना सांगताना दिसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ऐकूण वडिल अजिबात नाराज न होता आयुष्याचे चार बोल तिला ऐकवत ते आनंदाने तिच्या या नात्याचा स्वीकार करतात. अनेकांना वडिलांचे विचार आणि त्यांचा समजूतदारपणा भाळतो आणि नेटकरी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. 

नेमकं या व्हिडिओत झालं तरी काय ? 

सध्या इंटरनेटवर प्रचंड वेगाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ, मुलीच्या अधिकृत @driiiishtiiii या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओमध्ये, मुलगी तिच्या वडिलांचा हात धरून आई - वडिलांच्या जवळ बसलेली दिसत आहे, यावेळी ती खूप घाबरलेली दिसते. मग, थोडे धाडस करून ती तिच्या वडिलांना म्हणते, ” बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. माझा ११ वर्षांपासून एक बॉयफ्रेंड आहे.” यावर मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी ठरते. अशा प्रकरणांमध्ये पालकांनी रागावणे, चिडणे, ओरडणे अपेक्षित असले तरी, मुलीच्या वडिलांनी जे सांगितले त्याने इंटरनेटवर सर्वांचे मन जिंकले. ते मोठ्या प्रेमाने म्हणाले, “हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते. काळजी करण्याचे काय कारण आहे?”. बॉयफ्रेंड सगळ्यांचाच असतो तुझा पण आहे यात घाबरण्याचे कारण काय...वडिलांकडून हे ऐकून मुलीला अश्रू अनावर झाले आणि हे अश्रू भीतीचे नव्हते तर आनंदाचे होते. वडिलांनी तिला सांगितले की, ही चांगली बातमी सांगितली आहेस तू आणि दोन्ही मुले आता स्वावलंबी झाली आहेत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात.

रात्री जेवताना वाटीभर ‘ही’ डाळ खा, सुटलेलं पोट होईल सपाट-मांड्याही दिसतील सुडौल-वजन झरझर कमी...

नको डाळ-तांदूळ, नको पीठ आंबवण्याची झंझट! फक्त १५ मिनिटांत करा पांढरीशुभ्र, गुबगुबीत जाळीदार इडली.... 

मुलीच्या वडिलांनी सांगितले की धर्म, जात किंवा पैसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगा एक चांगला माणूस असावा आणि त्यांच्या मुलीला आनंदी ठेवावे. ते म्हणाला, “मला माझ्या मुलीच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे.” वडिलांच्या या शब्दाने फक्त मुलीलाचं नाही तर सोशल मिडियावरील सर्वच यूजर्सना आनंद झाला आहे. कुटुंबाचा सपोर्ट मनाला सुखावून जातो. वडिलांच्या कृतीने फक्त मुलीचेच नाही तर यूजर्सचेही मन जिंकले. त्यांच्या विचारसरणीचे अनेकांनी काैतुक केले आणि प्रत्येक पालकाने असा विचार करावा अशी इच्छा काहींनी व्यक्त केली.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter's 11-year affair revealed: Father's reaction wins hearts.

Web Summary : A daughter confessed to her father about her 11-year-long relationship. The father's understanding reaction, prioritizing her happiness over caste or religion, went viral, winning hearts online. He emphasized the importance of her partner being a good person.
टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओपालकत्वलग्न