Join us

Little Boy Eating Pickle : पहिल्यांदा लोणचं चाखून पाहिल्यानंतर बाळानं दिली 'अशी' रिएक्शन; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 13:57 IST

Little Boy Eating Pickle : व्हिडिओ पाहून अनेक पालक आपल्या मुलांचे बालपण आठवू लागले आहेत. या मुलाचा गोंडसपणा पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल

इंटरनेटवर दररोज हजारो व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील लहान मुलांच्या व्हिडीओला वेगळी फॅन फॉलोइंग असते. मुलांच्या निरागस कृत्याने प्रत्येकाचे मन आनंदीत होते. असेच काहीसे या व्हिडिओतही पाहायला मिळते. एका लहान बाळाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेक पालक आपल्या मुलांचे बालपण आठवू लागले आहेत. या मुलाचा गोंडसपणा पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. (Viral video cute little boy eating pickle first time make funny faces trending video on social media comedy)

व्हिडिओमध्ये लहान मूल जेवणाच्या टेबलावर बसलेले दिसत आहे. गळ्यात कापडही घालण्यात आले आहे जेणे करून खाताना एखादी गोष्ट पडली तर त्यावर डाग पडू नये. लहान मुलानं पहिल्यांदा लोणचं चाखून पाहिल्यानंतर त्याची रिएक्शन पाहण्यासारखी असते. (Trending Video) मुलाने लोणचे चाखताच  (Pickle) रिएक्शन द्यायला सुरुवात केली. त्याला ते लोणचे इतके आंबट वाटले की त्याने डोळेही घट्ट मिटले.

अभ्यास करत नाही म्हणून आईनं धोपटलं; पप्पांनी 'का रडतोस', असं विचारलं तर लेक म्हणाला..

हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. मुलाची प्रतिक्रिया पाहून अनेक यूजर्सना हसूही येऊ लागले. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्यांनाच बाळ खूप आवडलं. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओने अनेकांचे मनोरंजन केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 30 लाख लोकांनी लाईक केले आहे. इतकेच नाही तर काही लोक (Social Media Users) व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना टॅग करतानाही दिसले.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया