Join us

वऱ्हाड निघालं विमानानं! लग्नाचा थाट असा वऱ्हाडींसाठी बस नाही तर विमानच केलं बूक, पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 13:38 IST

Viral Video Couple Booked Whole Plane for Relatives and Friends to travel for Wedding : लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची आणि सेलिब्रेट करण्याची गोष्ट असून कोण त्यासाठी काय करेल सांगता येत नाही.

ठळक मुद्देवघ्या ३ दिवसांत जवळपास ९ लाख नेटीझन्सनी हा व्हिडिओ लाईक केलाअवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये लग्नाला जाणारे सगळे जण किती उत्साहात आहेत ते दिसत आहे. 

लग्न म्हटल्यावर वधुवरांना शुभेच्छा देण्यासाठी वऱ्हाडी तर हवेतच. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असलेला हा क्षण आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींसोबत साजरा करतो. याच लग्नाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी कोण त्यासाठी काय करेल सांगता येत नाही. हे लग्न आपण राहतो त्याच गावात असेल तर ठिक आहे. पण लग्न दुसऱ्या गावात असेल तर मात्र वऱ्हाडी मंडळींना कधी बसने आणि जास्त अंतर असेल तर रेल्वेने प्रवास करुन जावे लागते. वऱ्हाडी मंडळी जास्त असतील तर मुलाकडचे किंवा मुलीकडचे एखादी बस किंवा ट्रेनची बोगी बुक करतात. आता हे ठिक आहे. पण वऱ्हाडी मंडळींसाठी पूर्ण विमान बुक केल्याचे आपण फारसे ऐकले नसेल (Viral Video Couple Booked Whole Plane for Relatives and Friends to travel for Wedding). 

पण एका कपलने आपल्या लग्नाला येणाऱ्यांसाठी पूर्ण विमानच बुक केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लग्नसोहळा एन्जॉय करता यावा यासाठी हे खास आयोजन करण्यात आले होते. इन्स्टाग्रामवर श्रेया शाह नावाच्या एका महिलेने याचा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पूर्ण विमानच बुक केल्याचे या महिलेने म्हटले आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये लग्नाला जाणारे सगळे जण किती उत्साहात आहेत ते दिसत आहे. 

व्हिडिओच्या शेवटी ज्यांचे लग्न आहे ते कपलदेखील दिसते. तर व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला प्रसिद्ध पंजाबी गाण्याचे बोल जोडण्यात आले आहे. या व्हिडिओवर एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया आल्या असून लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अवघ्या ३ दिवसांत जवळपास ९ लाख नेटीझन्सनी हा व्हिडिओ लाईक केला असून लग्नाचा माहोल हा आनंद देण्याचा आणि घेण्याचा असतो हेच यातून दिसते. हे सगळे जरी खरे असले तरी हे कपल भारतातील नेमके कुठले आहे आणि ते आणि वऱ्हाडी मंडळी कुठून कुठे विमानाने प्रवास करत आहेत हे मात्र अद्याप समजले नाही.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्न