Join us

Viral video bride groom : वरात आलेली पाहून नवरी भलतीच खूश झाली; खिडकीत उभं राहूनच नाचू लागली; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:03 IST

Viral video bride groom : व्हिडिओमध्ये एक वधू, सुंदर लाल लेहेंगा परिधान करून खिडकीजवळ उभी असल्याचे दाखवले आहे.

लग्नाच्या दिवशी नटून बसलेली नवरी आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराची किती वाट पाहत असते हे याची तुम्हाला कल्पना असेलच.  सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या आधी एक हृदयस्पर्शी क्षण शेअर करताना दिसत आहेत. इतकी उत्साही नवरी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. 

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ एका दिवसापूर्वी  'witty_wedding' नावाच्या  वापरकर्त्याने या कॅप्शनसह पोस्ट केला, ' वधू तिच्या वराला पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही'.  सध्या हा व्हिडीओ हजारो व्ह्यूज आणि लाईक्ससह व्हायरल झाला आहे. 

व्हिडिओमध्ये एक वधू, सुंदर लाल लेहेंगा परिधान करून खिडकीजवळ उभी असल्याचे दिसत आहे. वधूला तिच्या भावी पतीला पाहण्यासाठी थांबता आले नाही म्हणून बारात आल्यावर ती खिडकीकडे धावली. त्यानंतर ती खिडकीतून तिच्या वराकडे पाहत नाचताना दिसते.  

शेरवानी घातलेला आणि घोड्यावर बसलेला वरही आपल्या भावी पत्नीकडे प्रेमाने पाहत नाचत आहे.  सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचे चल प्यार करेगी हे सुपरहिट लग्नाचं गाणं बॅकग्राउंडमध्ये ऐकून येत आहे. नेटिझन्सना हे जोडपे मोहक वाटलं आणि ते म्हणाले की  हे जोडपं एकमेकांवर खरोखर खूप प्रेम करतं. नेटिझन्सनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल