Join us

Viral Video : अरे देवा रे! आकाशपाळण्यात बसताच भावाला आठवले देव, त्याची ‘रिॲक्शन’ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:26 IST

Viral Video : व्हिडिओमधील मुलगा आकाश पाळण्यात बसताना खूप उत्साही दिसत आहे.  पाळणा वरच्या दिशेने सरकत असताना या मुलाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असते.

सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यांना पाहून लोक हसू लागतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर समोर आला आहे, जो  तुम्हालाही पोट धरून हसायला भाग पडेल. हा मनोरंजक व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे (Funny Boy Video). व्हिडिओमध्ये दिसणारा  मुलगा सुरूवातीला खूप उत्साहात असतो, काही वेळातच  तो एकामागून एक अनेक देवदेवतांच्या नावाचा जप करत आपली भीती दूर करण्याचा प्रयत्न करू लागतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

व्हिडिओमधील मुलगा आकाश पाळण्यात बसताना खूप उत्साही दिसत आहे.  पाळणा वरच्या दिशेने सरकत असताना या मुलाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असते. सुरुवातीला तो मस्तीच्या मूडमध्ये असल्याचं दिसतं, पण जसजसं आकाशपाळणा वरच्या दिशेनं जाऊ लागतो तसतसं या मुलाची भीती आणखी वाढत जाते. तो जय बजरंगबली, हरहर महादेव असं म्हणत एकाचवेळी अनेक देवांचा धावा करू लागतो. 

बाबौ! नवरा नवरीचं खतरनाक प्री वेडिंग फोटोशूट पाहून तुम्हालाही फुटेल घाम; पाहा व्हायरल व्हिडिओ

 हा व्हिडिओ एखाद्या फिल्मी सीनपेक्षा कमी वाटत नाही. या व्हिडिओत भीती हीच मोठी गोष्ट आहे, त्यातून भल्याभल्यांना घाम फुटतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून यूजर्स उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया